हा पुरस्कार १९९५ साली, नामीबियाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आला होता. ही उपाधी देशाच्या सर्वोच्च आणि प्रतिष्ठेची नागरी सन्मान म्हणून ओळखली जाते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक नेतृत्व क्षमतेबद्दल, दक्षिण भागात सहयोगासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि आफ्रिकन देशांशी मजबूत संबंध निर्माण केल्याबद्दल नामिबिया सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘Order of the Most Ancient Welwitschia Mirabilis’ प्रदान केला आहे.
हा पुरस्कार १९९५ साली, नामीबियाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन करण्यात आला होता. ही उपाधी देशाच्या सर्वोच्च आणि प्रतिष्ठेची नागरी सन्मान म्हणून ओळखली जाते.
पंतप्रधान मोदींच्या आंतरराष्ट्रीय सन्मानांची यादी
पंतप्रधान मोदींना २०१६ नंतर आजवर २९ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, हे कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचे सर्वाधिक जागतिक सन्मान ठरले आहेत. नुकतेच घानाकडून ‘Officer of the Order of the Star of Ghana’ हा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.
काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार पुढीलप्रमाणे:
२०२१ – भूतानने त्यांना Order of the Druk Gyalpo या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले.
२०१९ – रशियाने Order of St Andrew the Apostle, हा सर्वोच्च सन्मान दिला.
२०२३ – पापुआ न्यू गिनीने Order of Logohu आणि Ebakl Award हे दोन पुरस्कार दिले.
२०२३ – फ्रान्सने Grand Cross of the Legion of Honour, हा सर्वोच्च फ्रेंच नागरी सन्मान प्रदान केला.
२०२३ – ग्रीसने Grand Cross of the Order of Honour हा पुरस्कार दिला.
२०२४ – कुवेतने Mubarak Al-Kabeer Order या प्रमुख सन्मानाने गौरवले.
२०२४ – नायजेरियाने Grand Commander of the Order of the Niger हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार दिला.
मार्च २०२५ – मॉरिशसने Grand Commander of the Order of the Star and Key of the Indian Ocean हा देशातील सर्वोच्च सन्मान प्रदान केला.
२०२५ – श्रीलंकाने Sri Lanka Mitra Vibhushana हा सन्मान दिला, जो फक्त मैत्रीपूर्ण परदेशी नेत्यांना दिला जातो.
२०२५ – सायप्रसने Grand Cross of the Order of Makarios III हा पुरस्कार प्रदान केला.
२०२५ – घानाने Officer of the Order of the Star of Ghana हा सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक दिला.
जागतिक स्तरावर सर्वाधिक सन्मानित भारतीय पंतप्रधान
या सन्मानांव्यतिरिक्त नरेंद्र मोदी यांना अमेरिका, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, मालदीव आणि इतर अनेक राष्ट्रांकडूनही महत्त्वाचे नागरी पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक सन्मानित झालेले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.
या पुरस्कारांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व, परराष्ट्र धोरण, आणि विकासात्मक दृष्टिकोन अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे.


