अमेरिकेत आणखी एक भारतीय विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला आहे. मृत विद्यार्थ्याची ओळख श्रेयस रेड्डी बेनिगर असल्याचे सांगितले जात आहे. श्रेयस ओहायोच्या लिंडर स्कूल ऑफ बिझनेस येथे शिक्षण घेत होता.
पाकिस्तानात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीपूर्वी माजी पंतप्रधान इमरान खान यांना मोठा झटका बसला आहे. सिफर प्रकरणी इमरान खान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशींनाही दोषी ठरवण्यात आले आहे.
अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी मृताव्यस्थेत सापडला आहे. नील आचार्य असे विद्यार्थ्याचे नाव असून 28 जानेवारीपासून तो बेपत्ता होता.
डीपफेकची चिंता अमेरिकेत वाढली आहे. शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे काही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ ऑनलाइन व्हायरल झाले आहेत. यामुळे व्हाइट हाऊसने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
अलाबामा (US state Alabama) येथे नायट्रोजन गॅसचा वापर करून कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. शिक्षेची ही पद्धत असामान्य व क्रूर असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला होता.
दक्षिण आफ्रिकेत एका आरोपीने हत्येचा पुरावा मिटवण्याच्या नादात चक्क संपूर्ण इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत इमारतीमधील 76 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थिती लावणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रोन आज (25 जानेवारी) भारत दौऱ्यावर येणार असून जयपुरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत.
रशियाच्या हवाई दलाचे एक मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघात झालेल्या विमानात 65 युक्रेनी कैदी असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रिक्स देशांमध्ये जागतिक स्तरावर संबंध वाढण्यासाठी भारत आणि रशियाने डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी भागीदारी झाली आहे.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडला. देशभरात दिवाळी सणासारखे वातावरण आहे. याशिवाय जगभरातही रामललांच्या प्राणप्रतिष्ठेची धूम पाहायला मिळत आहे. नेपाळमधील जनकपुर येथील जानकी मंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे.