भारत आणि पाकिस्तानने लष्करी समजुती आणि चर्चेच्या तपशीलाची पुष्टी करण्यापूर्वीच, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला की हे दोन्ही राष्ट्रांमधील अमेरिका-मध्यस्थ चर्चेचे फलित आहे.
बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने बलूचिस्तानमध्ये ३९ ठिकाणी एकाच वेळी हल्ला केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. BLA ने पोलीस स्टेशन, लष्करी तळ आणि महामार्गांना लक्ष्य केले आहे आणि पुढील हल्ल्यांचा इशारा दिला आहे.
India Pakistan War: पाकिस्तानने भारतावर खोटे आरोप लावले होते, ज्याची सत्यता भारतीय विदेश मंत्रालयाने उघड केली. आता या प्रकरणात अफगाणिस्ताननेही पाकिस्तानला खोटे ठरवले आहे.
पाकिस्तानच्या लष्कराने राहुल गांधी आणि सत्यपाल मलिक यांच्या व्हिडिओ क्लिप्स आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत सादर केल्या, ज्यात भारतातील अंतर्गत मुद्द्यांवर त्यांची विधाने भारतविरोधी पुरावे म्हणून मांडली.
भारतीय हवाई दलाच्या ७ मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांचे पाच कुख्यात दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगातून सोडण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (NCS) दिलेल्या निवेदनानुसार, शनिवारी पाकिस्तानमध्ये ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला.
पाकिस्तान व्याप्त बलुचिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली असून, बलुच नेते मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडे मान्यता मागितली आहे. भारताला दिल्लीत बलुचिस्तानचे दूतावास सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
देशभरातील एटीएम २-३ दिवसांसाठी बंद राहतील असा खोटा दावा करणाऱ्या व्हायरल व्हाट्सअॅप मेसेजचा PIB ने खंडन केला आहे. PIB फॅक्ट चेकने मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे आणि एटीएम नेहमीप्रमाणे सुरू राहतील असे आश्वासन दिले आहे.
पाकिस्तानने ८ मे रोजी केलेल्या कृत्यामुळे भारत त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. भारत आयएमएफच्या बैठकीत पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीला विरोध करणार आहे कारण पाकिस्तान मदत निधीचा वापर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी करतो.
World