अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्का बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आरोप केला आहे की रशियाच्या अलीकडच्या हालचाली मॉस्कोला अधिक ताकदवान बनवण्यासाठी आहेत.
प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी हंटर बायडेन यांच्यावर $1 अब्जपेक्षा जास्त रकमेचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. बायडेन यांनी दावा केला होता की त्यांच्या पतीची ओळख लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनने करून दिली होती.
भारताने ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डच्या नियमांमध्ये कडक बदल केले आहेत. गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेल्या किंवा गंभीर आरोपांमध्ये आरोपपत्र दाखल झालेल्या OCI कार्डधारकांची नोंदणी रद्द केली जाईल.
अमेरिकेतील मोंटाना येथे झालेल्या विमान अपघातामुळे अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताच्या स्मृती ताज्या झाल्या आहेत. हेही विमान आगीच्या गोळ्यात रुपांतरीत झाल्याचे दिसून येते.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेतील भेटीदरम्यान भारताला अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा दिला आहे. “आम्ही अर्धा जग उद्ध्वस्त करू,” असे त्यांनी म्हटले आहे. या वक्तव्यामुळे दक्षिण आशियातील स्थैर्यतेबाबत चिंता वाढली आहे.
इस्राइलकडून पुन्हा गाझावर हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये अल जझिरा अरेबिकचे प्रतिनिधी यांच्यासह पाच पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इस्रायलने अल शरीफवर हमासशी संबंध असल्याचा आणि हल्ल्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.
NASA ने इंटरस्टेलर धुमकेतू 3I/ATLAS चा वेग 209,000 किमी/प्रति तास नोंदवण्यात आला आहे. हबल टेलिस्कोपने याचा स्पष्ट फोटो देखील घेतला असून हा रहस्यमय गोळा पृथ्वीसाठी धोकादायक नाही.
रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतावर ५०% आयात शुल्क लादले आहे. ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशानुसार २७ ऑगस्ट २०२५ पासून हे शुल्क लागू होणार असून, भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
Hiroshima Day 2025 : हिरोशिमा डे दरवर्षी ६ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, कारण १९४५ मध्ये या दिवशी अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यात हजारो निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आणि मानवतेवर अमानुषतेचा काळा ठसा उमटला.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी असे म्हटले की, भारत हा चांगला व्यापारी भागीदार राहिलेला नाही आणि ते पुढील २४ तासांत भारतावर आयात शुल्क (टॅरिफ) वाढवतील, अशा वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर निक्की हेली यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
World