Paris Olympics 2024 : मनू भाकरचा अंतिम फेरीत प्रवेश, भारताला पदकाची आशा

| Published : Jul 27 2024, 07:31 PM IST

manu bhakar

सार

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशीच भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. स्टार महिला नेमबाज मनू भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली आहे.

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताची स्टार महिला नेमबाज मनु भाकर हीने 10 मीटर एअर पिस्तूल या प्रकारात अंतिम फेरीत धडक दिली आहे. मनुने ते करुन दाखवलं जे पुरुषांनाही जमलं नाही. मनुआधी भारताच्या पुरुषांना या प्रकारात पुढे जाण्यात अपयस आलं. मात्र मनुने अचूक निशाणा लावून पुढील फेरीत धडक मारली आहे. मनूने यासह मेडलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळे आता भारतीयांना मनुकडून पदकाची आशा वाढली आहे. टॉप 8 मध्ये नेमबाजांनी अंतिम फेरीत जाण्यात यश मिळवलंय. मनूने 580 गुणांसह तिसरं स्थान पटकावलं आणि अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला.

मनू भाकरची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात केली शानदार सुरुवात

मनू आणि इतर खेळाडूंना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 6 सीरिज खेळाव्या लागल्या. मनूने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात शानदार सुरुवात केली. मनू या 6 पैकी पहिल्या 3 सीरिजमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली. तर दुसऱ्या बाजूला भारताची दुसरी नेमबाज रिदीमा सांगवान हीची 24 व्या स्थानी घसरण झाली. मनूची चौथ्या सीरिजमध्ये तिसऱ्या स्थानी घसरण झाली. मनुने पहिल्या 3 मालिकांमध्ये अनुक्रमे 97,97 आणि 98 असे गुण मिळवले. त्यानंतर मनुने चौथ्या सीरिजमध्ये 98 गुणांची कमाई केली. तर रिदीमाने कमबॅक करत 24 वरुन 16 व्या स्थानी झेप घेतली.

मनुने पाचव्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवले. तर सहाव्या आणि शेवटच्या सीरिजमध्ये 96 गुण मिळवत फायनलमधील स्थान सुनिश्चित केले. मनुने अशाप्रकारे सहा सीरिजमध्ये अनुक्रमे 97,97,98, 98,96 आणि 96 असे एकूण 580 पॉइंट्स मिळवले. तर रिदीमा सांगवान 15 व्या स्थानी राहिल्याने तीचे आव्हान इथेच संपुष्टात आले. रिदीमाने सहा सीरिजमध्ये 573 पॉइंट्स मिळवले. पुढील फेरीत प्रवेश मिळवण्यसाठी पहिल्या 8 मध्ये असणे आवश्यक होते. मात्र त्यात रिदीमाला अपयश आले. दरम्यान आता भारतीयांना मनुकडून सुवर्ण पदकाची आशा आहे. या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील पुढील फेरीतील सामना हा रविवारी 3 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे.

आणखी वाचा :

Paris Olympic 2024: उद्घाटन समारंभात हिंदीत प्रदर्शन करून भारताचा जलवा

Paris Olympic 2024,जुलै 27 वेळापत्रक: 'हे' खेळाडू आज भारतासाठी पदक घेऊन येणार