सार
Nepal Plane Crash : नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर एका प्रवासी विमानाला टेक ऑफ करताना अपघात झाला आहे. या विमानात 19 प्रवासी होते. 18 जणांचा मृत्यू या अपघातात झाला आहे.
Nepal Plane Crash : नेपाळच्या काठमांडू येथे त्रिभुवन एअरपोर्टवर टेक ऑफ घेताना प्रवासी विमान क्रॅश झाले आहे. या विमानात १९ प्रवासी होते. या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. जखमी प्रवाशावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुर्घटनेत पायलटचाही जीव बचावला असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे विमान काठमांडू ते पोखरा येथे जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्लेन सौर्य एअरलाईन्स विमान नंबर 9N AME होतं. विमान टेक ऑफ घेताना ते रन वेवरून घसरलं ज्यामुळे भीषण दुर्घटना घडली. अपघातात प्लेनच्या पुढच्या बाजूस आग लागली. या घटनेनंतर पंतप्रधान केपी ओली घटनास्थळी पोहचले होते. ज्या विमानाचा अपघात घडला त्यातील प्रवाशांची यादी समोर आली आहे. प्लेनमध्ये प्रवास करणारे सौर्य एअरलाईन्सचे स्टाफ सदस्य होते.
१ पायलट सुरक्षित, उपचार सुरू
काठमांडू त्रिभुवन एअरपोर्टवर झालेल्या दुर्घटनास्थळी बचाव पथक टीम हजर आहे. रेस्क्यू टीमने आग नियंत्रणात आणली आहे. १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. विमान दुर्घटनेत पायलट सुरक्षित असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. उपचारानंतर त्याची चौकशी केली जाऊ शकते.
विमान दुर्घटनेनंतर जे फोटो, व्हिडिओ समोर आलेत त्यात विमान आगीत राख झाल्याचे दिसते. या दुर्घटनेमुळे त्रिभुवन एअरपोर्टवरील विमानसेवेवर परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे आणि लँडिंग लखनौ आणि कोलकाता एअरपोर्टच्या दिशेने वळवण्यात आली आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर तातडीने रेस्क्यू टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ११.४० वाजेपर्यंत आग विझवण्यात आली अशी माहिती काठमांडू घाटी पोलीस कार्यालयाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश राज मैनाली यांनी दिली.
आणखी वाचा :
Nepal Plane Crash : विमानात बसलेले १९ प्रवासी मृत्युमुखी पडल्याची शक्यता?