हल्लेखोराला काही मिनिटांत ताब्यात घेण्यात आले. स्टोअरमधील काही नागरिकांनीही त्याला पकडण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

मिशिगन- शनिवारी दुपारी मिशिगनमधील ट्रॅव्हर्स सिटी येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात किमान ११ जण जखमी झाले आहेत. ग्रँड ट्रॅव्हर्स काउंटीचे शेरिफ मायकेल शिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय एका इसमाने दुकानात प्रवेश केला आणि फोल्डिंग चाकूने जवळपास डझनभर लोकांवर हल्ला केला.

हल्लेखोराला काही मिनिटांत ताब्यात घेण्यात आले. स्टोअरमधील काही नागरिकांनीही त्याला पकडण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

नजीकच्या मन्सन हेल्थकेअर रुग्णालयाने सांगितले की, पाच जणांची प्रकृती गंभीर असून सहा जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे. जखमींचे वय अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र शेरिफ कार्यालयाने स्पष्ट केले की ते वॉलमार्टचे कर्मचारी किंवा आपत्कालीन कर्मचारी नव्हते.

शेरिफ शिया यांच्या म्हणण्यानुसार, संशयित व्यक्ती मिशिगनमधील रहिवासी "आसावा असे वाटते", पण तो नक्की कुठून आहे यावर ते "सध्या भाष्य करू इच्छित नाहीत."

एफबीआयचे अधिकारी या प्रकरणी तपासासाठी आणि स्थानिक पोलिसांना मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत, असे डेप्युटी डायरेक्टर डॅन बॉन्गिनो यांनी सांगितले.

वॉलमार्टचे प्रवक्ते जो पेन्निंग्टन यांनी Fox News Digital ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले, “अशा प्रकारचे हिंसाचार पूर्णतः अस्वीकार्य आहे.”

"जखमींप्रती आमच्या सहवेदना आहेत आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांच्या जलद कारवाईबद्दल आम्ही आभारी आहोत. आम्ही तपासात पोलीस अधिकाऱ्यांशी पूर्ण सहकार्य करत आहोत," असे पेन्निंग्टन यांनी म्हटले.

मिशिगनच्या राज्यपाल ग्रेचेन व्हिटमर यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “ट्रॅव्हर्स सिटीमधून आलेल्या भयावह बातमीबद्दल मी पोलीस प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. पीडित आणि या हिंसक घटनेमुळे हादरलेल्या जखमींबाबत आमच्या भावना आहेत. संशयिताला अटक करण्यार्याचे मी आभार मानते.”

ट्रॅव्हर्स सिटी विषयी

ट्रॅव्हर्स सिटी हे मिशिगनच्या वायव्य भागात, ग्रँड रॅपिड्सपासून सुमारे १४० मैल अंतरावर असलेले एक छोटे शहर आहे. हे लेक मिशिगनच्या ग्रँड ट्रॅव्हर्स बेकिनारी वसलेले आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ माजली असून तपास यंत्रणा पुढील तपशील गोळा करत आहेत.