Jaish e Mohammed Recruits Women : भारताविरुद्ध लढण्यासाठी महिला दहशतवादी गट स्थापन करण्याची घोषणा करणाऱ्या जैश या दहशतवादी संघटनेने महिलांना आमंत्रित करण्यासाठी भारतीय हिंदू महिलांचे उदाहरण दिले आहे.

Jaish e Mohammed Recruits Women : भारताविरुद्ध लढण्यासाठी महिला दहशतवादी गट स्थापन करण्याची घोषणा करणाऱ्या जैश या दहशतवादी संघटनेने, महिलांना आमंत्रित करण्यासाठी भारतीय हिंदू महिलांचे उदाहरण दिले आहे.

यासंबंधीचा व्हिडिओ प्रसिद्ध

यासंबंधीचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून संघटनेचा प्रमुख मसूद अझर म्हणाला, 'जैशच्या शत्रूंनी (भारतीयांनी) हिंदू महिलांना सैन्यात सामील करून घेतले आहे. त्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात जमात-उल-मोमिनातची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी महिलांची नियुक्ती करण्याची जबाबदारी मुंताझिमागेंना दिली जाईल.'

'ओ मुस्लिम भगिनी' नावाचे पत्रक

यासोबतच 'ओ मुस्लिम भगिनी' नावाचे एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे, ज्यात 'या संघटनेत सामील होणाऱ्या महिलांना मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल' असे आश्वासन दिले आहे.

या संघटनेचे नेतृत्व मसूदची पत्नी उम्मे मसूद करत असून, तिने आठवड्यातून 5 दिवस ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे. कमांडरच्या पत्नी, मृत दहशतवाद्यांचे नातेवाईक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांची यासाठी भरती केली जात आहे.