Iran Claims Downing US F-35 Stealth Jet in Middle East Conflict: पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेचं F-35 स्टेल्थ फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने विमान इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं मान्य केलंय, पण हल्ल्याच्या दाव्यावर मौन बाळगलं आहे.

Iran Claims Downing US F-35 Stealth Jet in Middle East Conflict वॉशिंग्टन: पश्चिम आशियातील संघर्ष आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचला आहे. अशातच, जगातील सर्वात आधुनिक मानलं जाणारं अमेरिकेचं पाचव्या पिढीचं F-35 स्टेल्थ फायटर जेट इराणने पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने ही माहिती दिली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हे विमान मिडल ईस्टच्या एका लष्करी तळावर इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं मान्य केलं आहे, पण इराणच्या हल्ल्याच्या दाव्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 'CNN' च्या रिपोर्टनुसार, कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितलं की, नेमकं काय घडलं याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

जर हा हल्ला खरा ठरला, तर इराणसाठी हे एक मोठं लष्करी यश असेल. कारण F-35 विमान रडारलाही चकवा देण्यास सक्षम आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितलं की, पायलट सुरक्षित आहे, पण विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. इराणच्या हवाई हद्दीत उड्डाण करत असतानाच विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं, हेही सेंट्रल कमांडने मान्य केलं आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी नुकताच दावा केला होता की, अमेरिकेने इराणची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे आणि युद्धात अमेरिकेचं पारडं जड आहे. त्यानंतरच इराणने हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत अमेरिकेची १६ विमानं निकामी झाली आहेत किंवा पाडण्यात आली आहेत. यात १० रीपर ड्रोनचाही समावेश आहे. याशिवाय, कुवेतने चुकून अमेरिकेची तीन F-15 विमानं पाडली होती. गेल्या आठवड्यात इराकध्ये KC-135 टँकर विमान कोसळून सहा सैनिक ठार झाले होते.

काय आहे F-35 विमान?

हे विमान स्टेल्थ टेक्नॉलॉजीने बनलेलं आहे, ज्यामुळे ते शत्रूच्या रडारवर सहजासहजी दिसत नाही. शत्रूची विमानं पाडणं, महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक बॉम्बहल्ले करणं आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर होतो. एका विमानाची किंमत १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त (म्हणजे जवळपास ८०० कोटी रुपये) आहे. अमेरिका आणि इस्रायल इराणविरोधात या विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.