Indian Woman Found Dead in Ex Boyfriends US Apartment : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अमेरिकेत बेपत्ता झालेली २७ वर्षीय भारतीय तरुणी तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. तिच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. 

Indian Woman Found Dead in Ex Boyfriends US Apartment : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अमेरिकेत बेपत्ता झालेली २७ वर्षीय भारतीय तरुणी तिच्या माजी प्रियकराच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. अमेरिकेतील मेरीलँडमधील एका अपार्टमेंटमध्ये तिचा चाकूने वार केलेला मृतदेह सापडला. डेटा स्ट्रॅटेजी विश्लेषक असलेल्या निकिता गोडीशाला हिची हत्या झाल्याचे हॉवर्ड काउंटी पोलिसांनी सांगितले. निकिताचा मृतदेह तिचा माजी प्रियकर अर्जुन शर्मा याच्या मालकीच्या अपार्टमेंटमधून सापडला. तपास अधिकाऱ्यांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक वॉरंट जारी केले आहे.

अर्जुन शर्माने २ जानेवारी रोजी निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. ३१ डिसेंबर रोजी त्याने निकिताला शेवटचे त्याच्या अपार्टमेंटमध्ये पाहिले होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले. ३ जानेवारी रोजी पोलीस अपार्टमेंटमध्ये पोहोचले असता त्यांना तरुणीचा मृतदेह आढळला. निकिता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर त्याच दिवशी अर्जुन शर्मा भारतात गेल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.

३१ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजल्यानंतर निकिताची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. निकिताच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून, शक्य ती सर्व वाणिज्य दूतावासाची मदत दिली जाईल, असे भारतीय दूतावासाने कळवले आहे.