आर्मेनियामध्ये एका उत्सवादरम्यान काही भारतीय तरुणांनी तिथे असलेल्या लहान मुलींवर पाणी फेकत त्यांना त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणांवर जोरदार टीका केली आहे.
आर्मेनियामधल्या एका उत्सवात काही भारतीय तरुणांनी केलेलं गैरवर्तन सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, तो पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये काही तरुण उत्सवाचा आनंद घेत असल्याचं दिसतं, पण त्यांचा हा आनंद तेव्हा त्रासदायक ठरतो जेव्हा ते तिथे असलेल्या काही लहान मुलींवर पाणी फेकू लागतात.
सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या तरुणांनीच हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला. जणू काही आपण काहीच चुकीचं केलं नाहीये, अशा थाटात ते वावरत होते. पण व्हिडिओमध्ये त्या मुलींच्या चेहऱ्यावरचा त्रास स्पष्ट दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या तरुणांना चांगलंच धारेवर धरलं. काही लोकांनी हे तरुण नक्की कुठले आहेत आणि ते आर्मेनियाला कसे गेले, असे प्रश्न विचारले, तर बहुतेकांनी त्यांच्या या कृत्यावर कडक शब्दांत टीका केली.
पाहा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?
एका युझरने लिहिलं, "जर हे लोक कॅमेऱ्यासमोर असं वागत असतील आणि त्याचा व्हिडिओही टाकत असतील, तर विचार करा भारतीय हिंदू लोक लहान मुलींबद्दल काय विचार करतात आणि कॅमेऱ्यामागे काय करत असतील?"
दुसऱ्या एकाने म्हटलं, "याला वाटतं आपण युरोपियन महिलांसाठी खूप हँडसम आणि आकर्षक आहोत."
"असे लोक या देशांमध्ये पोहोचतातच कसे? आणि ते तिथे उदरनिर्वाहासाठी नक्की काय करतात?" असा सवाल आणखी एकाने विचारला आहे.
काही लोकांनी तर होळीचा संदर्भ देत म्हटलं, "हेच लोक भारतात होळीच्या वेळीही असंच वागतात." तर एकाने संतापून लिहिलं, “भारतीय पुरुषांना संमती या शब्दाचा अर्थच माहिती नाहीये.”












