सार

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक्स अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत. भारतातील ६५० दशलक्ष लोकांनी मोदींना मतदान केले. आपली मैत्री अशीच कायम राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाच्या नेतृत्वातील एनडीएला पुन्हा बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपानं सर्वाधिक २४० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. दिल्लीत आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार बनत आहे त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत.