गुगल आपले Chrome Browser विक्री करणार? या प्रकरणात वाढल्या अडचणी

| Published : Nov 19 2024, 10:01 AM IST / Updated: Nov 19 2024, 11:49 AM IST

Google Chrome
गुगल आपले Chrome Browser विक्री करणार? या प्रकरणात वाढल्या अडचणी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अमेरिकेतील न्याय विभागाकडून गुगलच्या विरोधात सुरू असणाऱ्या एंटीट्रस्ट प्रकरणात आता गुगलला आपले क्रोम ब्राउजर विक्री करण्यास सांगितले जाऊ शकते. गुगलवर असा आरोप लावण्यात आला आहे की, त्यांच्याकडून प्रतिस्पर्धींना दाबण्याचा प्रयत्न केला जातो.

Google to sell off chrome browser : अमेरिकेतील न्याय विभाग गुगलच्या विरोधात सुरू असणाऱ्या एंटीट्रस्ट प्रकरणात कोर्टासमोर गुगलला आपले क्रोम ब्राउजर विक्री करण्यास भाग पाडण्याची योजना तयार करत आहे. एंटीस्ट्रट प्रकरणात कोर्टाने म्हटले होते की, गुगलने अवैध रुपात सर्च मार्केटमध्ये एकाधिकार तयार करुन ठेवले आहे. क्रोमचा जगभरात सर्वाधिक प्रमाणात एखादी गोष्ट सर्च करण्यासाठी वापर केला जातो. गुगल आपल्या अन्य प्रोडक्ट्सला प्रोत्साहन देण्यासाठी देखील क्रोमचा वापर करतो. यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या विकासाचे मार्ग बंद होत आहेत.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्ट्सनुसार शासकीय वकीलांचे असे म्हणणे आहे की, गुगल सर्चचा एकाधिकारामुळे प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान होत आहे. याशिवाय गुगलद्वारे त्यांचे प्रोडक्ट्स प्रमोट करण्यासाठी क्रोमचा वापर करणे एक मोठा मुद्दा निर्माण झाला आहे. यामुळे प्रतिस्पर्ध्यांना मार्केटमध्ये प्रवेश करण्यासह आपले प्रोडक्ट्स युजर्सपर्यंत पोहोचवण्यासाठीची संधी कमी होत आहे.

याशिवाय रेग्युलेटरी अफेअर्सच्या उपाध्यक्ष ली-एन मुलहॉलैंड यांनी ब्लूमबर्ग यांना म्हटले की, न्याय विभागाने या प्रकरणात कायद्याच्या मुद्द्यावरुन पुढे जात एक कट्टरपंथी एजेंटा चालवत आहे. गुगलचे असे म्हणणे आहे की, हे पाऊल कंपनीच्या प्रतिस्पर्ध्यांचे वातावरण चुकीच्या पद्धतीने प्रभावित करू शकतो. याशिवाय अशा पावलामुळे उद्योगावर नकारात्मक परिणामही होऊ शकतो.

गुगलवर लागू केल्या जाऊ शकतात अटी
अमेरिकेतील न्याय विभागाकडून गुगलकडे काही महत्वपूर्ण बदल करण्याची मागणी केली जाऊ शकते. यामध्ये गुगलकडे Android ला Search आणि Google Pay पासून विभक्त करण्याच्या अटीचा समावेश आहे. दरम्यान, गुगलला अँड्रॉइडची विक्री करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. याशिवाय गुगलला जाहिरातदारांसह अधिक माहिती सामायिक करणे आवश्यक आहे. जाहिरातदारांना त्यांची जाहिरात कुठे दाखवायची याचा अधिकार गुगलने द्यावा असेही म्हटले आहे.

न्याय विभागाची गुगलकडे अशीही मागणी आहे की, संकेतस्थळांना अधिक पर्याय उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन त्यांची सामग्री गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोडक्ट्सद्वारे वापरली जाणार नाही. याशिवाय गुगलवर काही विशेष बंदी घालण्याची सिफारिश केली जाऊ शकते, जे एंटीट्रस्ट प्रकरणात केंद्रात असण्यासह प्रसिस्पर्ध्यांना नुकसान पोहोचवत आहेत.

आणखी वाचा : 

इस्त्रोचा GSAT-N2 उपग्रह स्पेसएक्सने प्रक्षेपित केला

३० मिनिटांत अमेरिका-भारत प्रवास! मस्क यांची 'स्टारशिप' योजना