Donald Trump Threatens 50 Percent Tariff : इराणसोबत दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानंतर काही तासांतच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन आर्थिक निर्बंध जाहीर केला आहे. 

Donald Trump Threatens 50 Percent Tariff : इराणसोबत दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या शस्त्रसंधीची घोषणा होऊन काही तास उलटत नाहीत तोच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवीन आर्थिक युद्ध पुकारलं आहे. त्यांनी सोशल मीडियावरून एक मोठी घोषणा केली आहे. जो कोणताही देश इराणला लष्करी शस्त्रं पुरवेल, त्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर तात्काळ ५० टक्के अतिरिक्त टॅक्स (जास्तीचा कर) लावला जाईल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

इराणला शस्त्रं पोहोचवणाऱ्या देशांकडून अमेरिका ज्या काही वस्तू खरेदी करते, त्या सगळ्यांवर हा नवा टॅक्स लागू होईल. यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट किंवा अपवाद नसेल, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. ट्रम्प यांनी थेट कोणत्या देशाचं नाव घेतलं नसलं तरी, त्यांचा रोख चीन आणि रशियाकडे असल्याचं आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानत आहेत. कारण हे दोन्ही देश इराणची लष्करी ताकद वाढवण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. चीन आणि रशिया इराणला क्षेपणास्त्रं आणि हवाई संरक्षण प्रणाली (air defence systems) देत असल्याचं बोललं जातं.

दरम्यान, बीजिंग आणि मॉस्को या दोन्ही देशांनी आपण अलीकडच्या काळात इराणला कोणतीही शस्त्रं दिली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, रशियावरील आरोप अजूनही कायम आहेत. या नव्या खेळीतून ट्रम्प यांनी इराणच्या आर्थिक नाड्या आवळण्यासोबतच, त्यांना मदत करणाऱ्या देशांच्या व्यापारालाही धक्का देण्याचं धोरण आखलं आहे. शस्त्रसंधी लागू असतानाही, आर्थिक दबावाखाली इराण आणि त्याच्या मित्र देशांना नियंत्रणात आणण्याचा वॉशिंग्टनचा हा प्रयत्न आहे. अमेरिकेच्या या नव्या निर्णयामुळे जागतिक व्यापार क्षेत्रात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.