लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअर लाइन्सच्या विमानाला उड्डाणानंतर काही वेळातच इंजिनला आग लागल्याने आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अग्निशमन दलाने आग विझवली.

शुक्रवारी अटलांटाला जाणाऱ्या डेल्टा एअर लाइन्सच्या विमानाला लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एलएएक्स) आपत्कालीन लँडिंगसाठी परत जावं लागलं कारण उड्डाणानंतर काही वेळातच त्याच्या एका इंजिनला आग लागली. विमानाच्या डाव्या ईंजिनमधून आगीच्या ज्वाळा येत असल्याचे दिसून येत आहे.

कोणालाही दुखापत झाली नाही 

कोणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. विमानतळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत केली आणि लँडिंगनंतर आग विझवली आहे. वैमानिकाने तातडीने लँडिंग केल्यामुळं प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

काय झालं? - 

१८ जुलै रोजी लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (LAX) वरून अटलांटा (ATL) साठी निघालेल्या डेल्टा एअर लाईन्स विमानाची ही घटना घडली. टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच, विमानाच्या कर्मचाऱ्यांना विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे आढळले. हे विमान N836MH नोंदणीकृत बोईंग 767-400 विमानाने चालवले जात होते. हे विमान २४.६ वर्षे जुने आहे आणि दोन GE CF6 इंजिनांनी चालवले जाते.

आणीबाणी केली घोषित फ्लाइट

 DL446 च्या वैमानिकांनी ताबडतोब आणीबाणी घोषित केली आणि परत विमानतळावर उतरवण्यास सांगितलं. एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने विमानतळ आपत्कालीन पथकांना सतर्क करत विमानाच्या सुरक्षित लँडिंग केले. लँडिंगनंतर, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इंजिनमधील आग विझवली आणि प्रवाशांमध्ये किंवा क्रूमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही.