BAPS Hindu Mandir : अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

| Published : Feb 14 2024, 07:01 PM IST / Updated: Feb 14 2024, 07:15 PM IST

BAPS Hindu Temple in UAE

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस युएईच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) अलहान मोदी कार्यक्रमात सहभागी झाले होते. आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबू धाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

BAPS Hindu Mandir : संयुक्त अरब अमिराती देशात (UAE) अयोध्येसारखे भव्य हिंदू मंदिर उभारण्यात आले आहे. 700 कोटी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या बीएपीएस हिंदू मंदिरांचे (BAPS Hindu Temple) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते बुधवारी (14 फेब्रुवारी) करण्यात आले आहे. 

अबू धाबीमधील शेख जायद राजमार्गावर अल रहबाजवळील अबू मुरीखा येथे बीएपीएस मंदिर उभारण्यात आले आहे.या मंदिराचे बांधकाम वर्ष 2019 पासून सुरू झाले असून 27 एकर जमिनीवर ते उभारण्यात आले आहे.

बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनासाठी भारतीयांनी अबू धाबीमध्ये( Abu Dhabi) मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याशिवाय गायक सोनू निगम यांच्यासह शंकर महादेवन देखील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी युएईत आले आहेत. शंकर महादेवन यांनी म्हटले की, “युएईमधील बीएपीएस मंदिराचे उद्घाटन भारत आणि जगभरातील सर्व भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. हा आपल्या आयुष्यातील ऐतिहासिक क्षण आहे. हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच होऊ शकले.”

 

युएईमधील बीएपीएस हिंदू मंदिरांची पाहा झलक

वर्ष 2015 मधील युएई दौऱ्याची काढली आठवण
मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईत दाखल झाले आहेत. युएईत आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान ((Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधानांनी 'अहलान मोदी' कार्यक्रमाला संबोधित केले. या कार्यक्रमासाठी भारतीय समुदायातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 याशिवाय नरेंद्र मोदींनी वर्ष 2015 मध्ये त्यांचे युएईत करण्यात आलेल्या स्वागताबद्दलची आठवणही कार्यक्रमादरम्यान सांगितली. भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच युएई दौरा असल्याचेही मोदींनी म्हटले.

आणखी वाचा : 

UAE मधील भव्य हिंदू मंदिराबद्दलच्या या खास गोष्टी घ्या जाणून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी Ahlan Modi कार्यक्रमात सहभागी होण्यास उत्सुक, भारतीय प्रवाशांवर गर्व असल्याची दिली प्रतिक्रिया

Digital Payments : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मॉरिशस, श्रीलंका येथे UPI - RuPay सुविधेचा शुभारंभ (Watch Video)