Baloch Leader Seeks Indias Support Against Pakistan China : बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध आवाज उठवला असून, भारताकडे सहकार्य मागितले आहे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे.

Baloch Leader Seeks Indias Support Against Pakistan China : बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध आवाज उठवला असून, आपल्या अनेक मागण्यांसाठी भारताकडे सहकार्य मागितले आहे. यासंदर्भात बलूच नेते मीर यार बलूच यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे.

'चीन आणि पाकिस्तानचे संबंध दिवसेंदिवस घट्ट होत आहेत. पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात चीन पुढील काही महिन्यांत सैन्य तैनात करण्याची शक्यता आहे. हे भारतासाठीही धोकादायक आहे,' असे बलूच नेते मीर यार बलूच यांनी मंत्री जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच, 'पाकिस्तान आमचे हक्क हिरावून घेत आहे. याविरोधातील आमच्या लढ्याला तुम्ही पाठिंबा द्यावा,' अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Scroll to load tweet…

याशिवाय, 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानचा अहंकार मोडणाऱ्या भारताच्या पराक्रमाचेही त्यांनी कौतुक केले आहे.

'बीजिंग-इस्लामाबाद युती अधिक घट्ट होत आहे. पुढील काही महिन्यांत चीन बलुचिस्तानमध्ये आपले सैन्य तैनात करू शकतो. हे भारतासाठीही धोकादायक आहे. तुम्ही याला विरोध केला पाहिजे,' असे ते म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर'बद्दल अभिनंदन:

'ऑपरेशन सिंदूर'ने पाक-पुरस्कृत दहशतवादी तळ नष्ट केले. हे भारताचे धैर्य आणि प्रादेशिक सुरक्षेसाठीची वचनबद्धता दर्शवते. सर्व भारतीयांना २०२६ सालच्या शुभेच्छा. भारत आणि बलुचिस्तान यांच्यातील अनेक दशकांच्या संबंधांवर प्रकाश टाकण्याची ही उत्तम संधी आहे,' असे त्यांनी नमूद केले आहे.

Scroll to load tweet…

दुष्ट शेजाऱ्यापासून देशवासियांचे रक्षण करणे हा आमचा हक्क : जयशंकर

पाकिस्तानला 'वाईट शेजारी' संबोधत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, 'अशा देशाने पोसलेल्या दहशतवादापासून आपल्या देशवासियांचे रक्षण करणे हा भारताचा हक्क आहे.' याद्वारे, 'ऑपरेशन सिंदूर' करून भारताने चूक केली, असे वक्तव्य करणाऱ्या लष्कर संघटनेचा उपप्रमुख सैफुल्ला कसूरी याला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मद्रास आयआयटीमध्ये बोलताना जयशंकर म्हणाले, 'दुर्दैवाने, आपल्या पश्चिमेकडील दुष्ट देश (पाक) जाणीवपूर्वक, सातत्याने आणि कोणताही पश्चात्ताप न बाळगता दहशतवाद सुरू ठेवण्याचा निर्णय घेत असेल, तर त्यापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करणे हा आमचा हक्क आहे. तो कसा वापरायचा हा आमचा प्रश्न आहे. इतरांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही,' असे ते म्हणाले. तसेच, दहशतवाद थांबवल्याशिवाय सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला देणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.