MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Axiom Mission 4 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात घेऊन गेलेत चक्क मिठाईचे दुकान, जाणून घ्या कोणकोणत्या मिठाई घेऊन गेलेत

Axiom Mission 4 : भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळात घेऊन गेलेत चक्क मिठाईचे दुकान, जाणून घ्या कोणकोणत्या मिठाई घेऊन गेलेत

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, अॅक्सिओम-४ मोहिमेतील अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात झाले. शुभांशु शुक्ला आणि तीन अंतराळवीर अंतराळयान केनेडी स्पेस सेंटरहून अवकाशात झेपावले. या मोहिमेसाठी शुभांशु यांनी चक्क मिठाईचे दुकानच अंतराळात नेले आहे. 

2 Min read
Author : Vijay Lad
Published : Jun 25 2025, 03:29 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गुरुवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार
Image Credit : X (@IndiaInSky)

गुरुवारी संध्याकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार

फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरहून अंतराळयान भारतीय वेळेनुसार १२:०१ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. २८ तासांच्या प्रवासानंतर, गुरुवारी संध्याकाळी ४:३० वाजता (IST) अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचेल अशी अपेक्षा आहे. अंतराळवीर ISS मध्ये सुमारे १४ दिवस घालवणार आहेत.

या मोहिमेत शुभांशु शुक्लांसह अमेरिका, पोलंड आणि हंगेरीतील अंतराळवीर सहभागी झाले आहेत. ही मोहीम भारतासाठी खूप खास आहे, कारण १९८४ मध्ये राकेश शर्मा नंतर, आता भारत आपला दुसरा अंतराळवीर अवकाशात पाठवत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
शुभांशु शुक्ला यांनी सोबत कोणते खाद्यपदार्थ नेले?
Image Credit : X

शुभांशु शुक्ला यांनी सोबत कोणते खाद्यपदार्थ नेले?

या मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला आपल्या बॅगेत काही रंजक वस्तू घेऊन गेले आहेत. त्यात त्यांच्या आवडीचा गाजराचा हलवा आणि इतर आवडते गोड पदार्थ आहेत. यासोबतच त्यांनी आंब्याचा रस, मूग डाळीचा हलवाही नेला आहे. हलवा हा त्यांचा विकपॉईंट असल्याचे सांगितले जाते.

Related Articles

Related image1
Axiom-4 Shubhanshu Shukla : अंतराळ यानाचे प्रक्षेपण, 41 वर्षानंतर पहिल्यांदा अंतराळात फडकणार भारताचा झेंडा, ISS वर जाणारे शुभांशु असतील पहिले भारतीय
Related image2
WhatsApp Feature : आता एकच WhatsApp अकाऊंट वापरा दोन मोबाईल फोनवर
35
सॉफ्ट टॉय सुद्धा
Image Credit : ISRO X Account

सॉफ्ट टॉय सुद्धा

आवडत्या गोड पदार्थांसोबतच, मोहिमेत त्यांनी एक छोटेसे सॉफ्ट टॉय देखील घेतले आहे. त्याचे नाव शुभांशु जॉय असे ठेवले आहे. ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी आपले सॉफ्ट टॉय दाखवले. हे सॉफ्ट टॉय हंसासारखे दिसते.

हे X-4 मधील पाचवे क्रू मेंबर असेल असे ते म्हणाले. मोहीम सुरू झाल्यानंतर, ते मायक्रोग्रॅव्हिटी स्थितीत पोहोचल्याचे क्रूला संकेत देईल. म्हणजेच गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे गेल्यावर हे खेळणे हवेत तरंगेल.

45
या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश काय?
Image Credit : X

या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश काय?

या प्रक्षेपणादरम्यान ३१ देशांमधून एकूण ६० संशोधने केली जातील. भारताच्या बाबतीत मेथी, मूग डाळ वाढ, अंकुर वाढ यावर संशोधन केले जाईल. स्नायूंच्या पुनर्निर्मिती, टार्डिग्रेड्सवर अभ्यास केला जाईल. तसेच क्लासरूम STEM आउटरीच, स्क्रीन कॉग्निटिव्ह चाचण्या घेतल्या जातील.

55
शुभांशु शुक्लाची भूमिका काय?
Image Credit : axiom.space

शुभांशु शुक्लाची भूमिका काय?

या प्रयोगांमध्ये मेथी, मूग डाळीचे अंकुर, टार्डिग्रेड सूक्ष्मजीव आणि मायक्रो अल्गीवर संशोधन केले जाईल. शुभांशुचा अनुभव आणि प्रशिक्षणाचे टप्पे भविष्यातील गगनयान मोहिमेसाठी खूप मौल्यवान ठरतील.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VL
Vijay Lad
जागतिक बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Indian Navy Rescue : भारतीय नौदलाची कमाल! २० नागरिकांची केली सुटका, इराणने मानले आभार
Recommended image2
Disney Layoffs : डिझ्नीमध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर गदा
Recommended image3
Nepal Helicopter Crash : नेपाळमध्ये लँडिंग करताना दोन हेलिकॉप्टरची धडक, थरारक व्हिडिओ व्हायरल
Recommended image4
Viral Video: डेल्टा एअरलाइन्सच्या पायलटची भन्नाट अनाउन्समेंट, व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Shah Rukh Khan Turns 61 : शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त बुर्ज खलिफावर झळकला खास मेसेज!
Related Stories
Recommended image1
Axiom-4 Shubhanshu Shukla : अंतराळ यानाचे प्रक्षेपण, 41 वर्षानंतर पहिल्यांदा अंतराळात फडकणार भारताचा झेंडा, ISS वर जाणारे शुभांशु असतील पहिले भारतीय
Recommended image2
WhatsApp Feature : आता एकच WhatsApp अकाऊंट वापरा दोन मोबाईल फोनवर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved