Agri News: दुर्मिळ पांढऱ्या स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती, सौदी अरेबियाने रचला इतिहास
(Agri News) रियाध : जगभरात कृशी क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जात आहे. आता सौदी अरेबियाने या क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. दुर्मिळ पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे पीक घेण्यात सोदीला यश आले आहे. जाणून घेऊया त्याची माहिती -

कृषी क्षेत्रासाठी मोठे यश
सौदी अरेबियामध्ये दुर्मिळ पांढऱ्या स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन इतिहास रचला गेला आहे.
पांढऱ्या स्ट्रॉबेरी
हाइल भागातील शेतकऱ्यांनी यशस्वीरित्या पिकवलेल्या या पांढऱ्या स्ट्रॉबेरीमुळे देशाच्या कृषी विविधतेला नवी बळकटी मिळत आहे.
जगात तिसरा देश
अमेरिका आणि जपाननंतर या विशेष जातीचे व्यावसायिक उत्पादन करणारा सौदी अरेबिया जगातील तिसरा देश बनला आहे. जगात दुर्मिळ असलेल्या पांढऱ्या स्ट्रॉबेरी त्यांच्या वेगळ्या चवीमुळे आणि उच्च बाजार मूल्यामुळे ओळखल्या जातात.
कापणीसाठी ३० दिवस
ही एक संकरित जात आहे. लाल स्ट्रॉबेरीचे मादी फूल आणि अननसाचे नर फूल यांच्यात कृत्रिम परागण करून ही विशेष जात विकसित केली आहे. फुलोऱ्यापासून कापणीपर्यंत पिकायला सुमारे ३० दिवस लागतात.
हाइलमध्ये कापणी
अमेरिकेच्या फ्लोरिडा विद्यापीठासोबत केलेल्या विशेष करारानुसार हाइलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची शेती सुरू झाली. यासाठी आधुनिक सिंचन पद्धती आणि प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
हाइल स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये कार्यक्रम
हाइल स्ट्रॉबेरी गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात, प्रांतीय गव्हर्नर अमीर अब्दुल अझीझ बिन सौद यांनी पांढऱ्या स्ट्रॉबेरीच्या कापणीचे उद्घाटन केले.
कृषी प्रदर्शन
त्यांनी हाइल स्ट्रॉबेरी गार्डनच्या सातव्या सीझनचा भाग म्हणून आयोजित केलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. या कार्यक्रमात प्रमुख अमीर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

