एक आलिशान जीवन जगणाऱ्या ब्राझिलियन अभिनेत्या जेफरसन मेकाडो यांचे रहस्यमय निधन झाले आहे. त्यांचा मृतदेह त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या घरामागे एका बॉक्समध्ये सापडला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
कधी कोणासोबत काय होईल ते सांगता येत नाही. आलिशान आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्यासोबत अशीच काहीतरी दुर्घटना घडली आहे. त्याने एक दिवस कॉल बॉयला घरी बोलावले आणि नको ते घडले. त्याच्यासोबत शारीरिक संबंध निर्माण केले. नंतर नको तसे व्हिडीओ बनवले होते. त्यानंतर हा अभिनेता हा अचानक गायब झाला होता.
आजूबाजूच्या लोकांना तो गायब झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना सांगितलं. नंतर जे सत्य समोर आले पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकली. आपण ज्या अभिनेत्याबाबत बोलत आहोत ते तो ब्राझिलियन अभिनेता जेफरसन मेकाडो हा आहे. त्याचा जन्म ब्राझीलमध्ये झाला होता. त्याने करिअरची सुरुवात पत्रकार केली होती.
दिसायला होता हँडसम
हा अभिनेता दिसायला हँडसम होता. त्याला टीव्ही शोच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या. त्यानंतर जेफरसन ब्राझिलमधील पॉश भागात शिफ्ट झाला. त्याची ओळख सूजा रोडरिगशी झाली. सूजा हा टीव्ही चॅनेल ग्लाबोसाठी काम करत होता. जेव्हा सूजाला पैशांची गरज होती तेव्हा जेफरसनने त्याला मोठ्या रक्कमेची मदत केली होती. पैसे परत देताना सूजा जेफरसला चॅनेल ग्लाबोवर मोठी संधी देणार होता.
कुत्रा रस्त्यावर आला
डिसेंबर २०२२ मध्ये सुजाने जेफरसनच्या घरापासून २० किलोमीटर अंतरावर एक घर भाड्याने घेतली होती. जेफरसनला कुत्र्यांची आवड होती. त्याच्याकडे एकूण ८ कुत्रे होते. २७ जानेवारी २०२३ रोजी पाळीव कुत्रा रस्त्यावर फिरताना दिसले. शेजारच्यांनी ते पाहिलं असून एका एनजीओला माहिती दिली होती. कुत्र्याच्या गळ्यातील पट्यांमुळे तो कुत्रा कोणाचा आहे लक्षात आले.
आईसोबत शेवटचा झाला फोन
२३ जानेवारी रोजी जेफरसनच्या त्याच्या आईसोबत शेवटचा फोन झाला होता. सुजाकडे जेफरसनच्या घराच्या चाव्या, गाडीची चावी आणि वॉलेट देखील होते. ते पाहून कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले होते. जेफरसनची डेडबॉडी सुजाच्या घरामागे सापडली होती. त्याची बॉडी बॉक्समध्ये सापडली. त्यानंतर खरी सत्यता दिसून आली.
