काय सांगता... आता Xiaomi ची स्कूटरही आली, बसची गरज नाही!, या गोष्टी आहेत यात खास..
Xiaomi ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 6 Lite मॉडेल सादर केली आहे. ही स्कूटर 25km/h वेग, 25km रेंज आणि 10-इंच टायर्ससह दररोजच्या शहरी प्रवासासाठी डिझाइन केली आहे.

Xiaomi स्कूटर 6 Lite
Xiaomi ने जागतिक बाजारपेठेसाठी आपले नवीन Electric Scooter 6 Lite मॉडेल सादर केले आहे. हे Electric Scooter 6 सीरिजमधील सर्वात स्वस्त मॉडेल असून Scooter 6 आणि Scooter 6 Max च्या खाली याचे स्थान आहे. रोजच्या ऑफिस प्रवासासाठी आणि शहरात फिरण्यासाठी हे डिझाइन केले आहे. याचे वजन कमी असून आकार कॉम्पॅक्ट आहे. पण, सध्या याची किंमत जाहीर केलेली नाही.
ई-स्कूटरची 25km रेंज
या ई-स्कूटरमध्ये 300W सतत पॉवर आणि 500W पीक आउटपुट देणारी हॉल-इफेक्ट ब्रशलेस मोटर आहे. तिचा कमाल वेग 25km/h पर्यंत जातो. तसेच, ती 15% पर्यंतचा चढ सहज चढू शकते. यात 216Wh लिथियम बॅटरी वापरली आहे. 15km/h वेगाने ही स्कूटर 25km पर्यंत जाऊ शकते. स्पोर्ट मोडमध्ये रेंज सुमारे 20km पर्यंत कमी होऊ शकते.
10-इंच न्यूमॅटिक टायर असलेली स्कूटर
आरामदायक प्रवासासाठी यात 25mm ड्युअल-स्प्रिंग फ्रंट सस्पेंशन दिले आहे. तसेच, 10-इंच न्यूमॅटिक टायर्समुळे खराब रस्त्यांवरही चांगली पकड मिळते. ब्रेकिंगसाठी समोर ड्रम ब्रेक आणि मागे E-ABS दिले आहे. रात्रीच्या प्रवासासाठी 2.5W हेडलॅम्प (सुमारे 15 मीटर प्रकाश) आणि ब्रेक लावल्यावर चमकणारा मागचा दिवा आहे.
रोजच्या प्रवासासाठी उत्तम स्कूटर
यात पेडेस्ट्रियन (6km/h), स्टँडर्ड (15km/h), आणि स्पोर्ट (25km/h) असे 3 रायडिंग मोड आहेत. हँडलवरील डिस्प्लेवर वेग, बॅटरी आणि मोडची माहिती दिसते. Xiaomi Home ॲपद्वारे तुम्ही रेंज/बॅटरीची स्थिती, ट्रिप हिस्ट्री, टायर प्रेशर आणि मोटर लॉक यांसारखी सेटिंग्ज नियंत्रित करू शकता. याची फ्रेम 100kg पर्यंत वजन सहन करू शकते. स्कूटरचे वजन 18.1kg आहे. बॉडीला IPX4 आणि बॅटरीला IPX6 रेटिंग आहे. भारतात Xiaomi ई-स्कूटर अधिकृतपणे लाँच झाली नसल्यामुळे, 6 Lite भारतात येण्याची शक्यता कमी आहे.

