Free Pith Girni Yojana : राज्य सरकारच्या मोफत पीठ गिरणी योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 90% अनुदान मिळणार आहे.
Free Pith Girni Yojana : राज्य सरकारनं ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं मोफत पीठ गिरणी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार असून, नियमित उत्पन्नाचा मार्गही खुला होणार आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?
या योजनेतून महिलांना पीठ गिरणी खरेदीसाठी मोठं अनुदान मिळणार आहे. फक्त 10% रक्कम स्वतः भरून महिलांना गिरणी उभारता येणार असून उर्वरित 90% खर्च शासन उचलणार आहे. त्यामुळे अगदी कमी गुंतवणुकीत महिलांना आपल्या गावातच व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या महिलांना मिळणार फायदा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू असतील.
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
वय 18 ते 60 वर्षांदरम्यान असावे.
अनुसूचित जाती किंवा जमातीतील असणे आवश्यक.
वार्षिक उत्पन्न ₹1.20 लाखांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराच्या नावावर बँक खाते असावे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जात प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
बँक खात्याचा तपशील
पासपोर्ट साइज फोटो
BPL कार्ड (असल्यास)
अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांनी स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरावा लागेल. अर्जाची सखोल पडताळणी केल्यानंतर पात्र लाभार्थींना अनुदान मंजूर केले जाते. मंजूर झाल्यानंतर हे अनुदान थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाते.


