ग्रीक अधिकाऱ्यांना जहाजाच्या कॅप्टननेच या घटनेची माहिती दिली. महिला समुद्रात पडल्यानंतर तब्बल तीन तासांनी कोस्ट गार्डला याची माहिती मिळाली, असं कोस्ट गार्डचे प्रवक्ते थिओफॅनिस बालत्सुकास यांनी माध्यमांना सांगितलं.

रॉयल कॅरिबियन क्रूझवरून एका महिलेने थेट समुद्रात उडी मारली. ग्रीसच्या झाकिन्थोस बेटाजवळून या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. जहाजावरून उडी मारल्यानंतर ही महिला तब्बल २० तास समुद्रात पोहत होती.

या महिलेने 'ओडिसी ऑफ द सीज' या रॉयल कॅरिबियनच्या सर्वात मोठ्या जहाजांपैकी एकावरून उडी मारली. हे महाकाय जहाज १,१३८ फुटांपेक्षा जास्त लांब असून त्याचं वजन १,६९,००० टनांहून अधिक आहे.

नेमकं काय घडलं?

जहाजाच्या कॅप्टननेच ग्रीक अधिकाऱ्यांना महिला बेपत्ता असल्याची माहिती दिली. महिला समुद्रात पडल्यानंतर सुमारे तीन तासांनी कोस्ट गार्डला याची माहिती मिळाली, असं कोस्ट गार्डचे प्रवक्ते थिओफॅनिस बालत्सुकास यांनी माध्यमांना सांगितलं.

सुमारे २० तास समुद्रात पोहणाऱ्या या महिलेला हेलेनिक कोस्ट गार्डने वाचवलं. कोस्ट गार्डने या थरारक बचावकार्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात ती महिला लाईफ जॅकेट घालून पाण्यावर तरंगताना आणि बचाव पथक तिला दोरीच्या साहाय्याने वर खेचताना दिसत आहे.

YouTube video player

समुद्रात उडी मारण्याचं कारण काय?

कोस्ट गार्डचे दुसरे प्रवक्ते जॉर्ज सप्रास यांनी सांगितलं की, 'मला जहाजावरून खाली उतरायचं होतं, म्हणूनच मी उडी मारली,' असं या महिलेने सुटकेनंतर स्पष्ट केलं. स्थानिक सरकारी वकिलांच्या आदेशानुसार, या महिलेची वैद्यकीय तपासणी आणि मानसिक आरोग्याची चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, काटाकोलो पोर्ट ऑथॉरिटीने या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशीही सुरू केली आहे.