MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Water Tank Placement : पाण्याची टाकी नेहमी छतावरच का असते? खाली बांधली तर काय होईल?

Water Tank Placement : पाण्याची टाकी नेहमी छतावरच का असते? खाली बांधली तर काय होईल?

भारतात कुठेही पाहिलं तरी लोक पाण्याची टाकी छतावरच बसवतात. पण ती खाली का बसवत नाहीत? जमिनीवर टाकी बांधली तर खरंच काही अडचण येते का? यामुळे नेमक्या कोणत्या समस्या वाढतात? चला सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 23 2026, 11:36 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
खाली पाण्याची टाकी का बांधू नये?
Image Credit : Asianet News

खाली पाण्याची टाकी का बांधू नये?

भारतात कुठेही पाहिलं तरी लोक पाण्याची टाकी छतावरच बसवतात. पण अनेक लोक जागेअभावी किंवा साफ करायला सोपं पडेल म्हणून पाण्याची टाकी खाली बांधतात. दिसायला हे चांगलं वाटत असलं तरी, रोज वीज आणि पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. टाकी खाली असेल तर पाणी आपोआप वर जात नाही.

एक थेंबही पाणी येणार नाही

टाकी खाली असेल तर स्वयंपाकघर, बाथरूम किंवा वरच्या मजल्यावर पाणी नेण्यासाठी प्रत्येक वेळी मोटर चालू करावी लागते. यामुळे विजेचं बिल खूप जास्त येतं. मोटर वारंवार खराब होऊन खर्च वाढतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, लाईट गेली तर नळातून पाण्याचा एक थेंबही येत नाही. आणीबाणीच्या वेळी वीज नसेल तर घरातलं कोणतंही काम होत नाही. संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
छतावर टाकी बसवणेच बेस्ट
Image Credit : Gemini AI

छतावर टाकी बसवणेच बेस्ट

ग्रॅव्हिटीमुळे पाणी नेहमी वरून खाली वेगाने येतं. टाकी जेवढ्या उंचावर असेल, तेवढ्याच जास्त प्रेशरने नळातून पाणी येतं. तुम्ही छतावर टाकी बसवली तर मोटर आणि विजेची गरज भासत नाही, नळ चालू करताच पाणी येतं. यामुळे विजेची मोठी बचत होते. म्हणूनच घर बांधताना टाकी खाली न बांधता छतावरच बसवावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

Related Articles

Related image1
Solar Power: घराघरात सौरऊर्जा, 'सूर्य घर' योजनेचा धुमाकूळ! रोज १६,००० हून अधिक घरांवर सोलर पॅनल
Related image2
Solar Kitchen : ना गॅस, ना वीज... तरीही रोज 50 हजार लोकांसाठी जेवण, हे कसं शक्य आहे?
34
कीटकांपासून संरक्षण
Image Credit : Gemini AI

कीटकांपासून संरक्षण

तुम्ही जमिनीवर किंवा अंडरग्राउंड टाकी बांधली, तर त्यात पावसाचं पाणी आणि कीटक जाण्याचा धोका असतो. टाकीवर झाकण नीट नसेल तर डास जमा होतात आणि डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार पसरतात. तसेच पावसाचं पाणी लीक होऊन टाकीत मिसळलं, तर पिण्याचं पाणी दूषित होतं आणि घरातील लोकांचं आरोग्य बिघडतं.

याउलट छतावर टाकी असेल तर ती साफ करणं खूप सोपं असतं. सूर्यप्रकाशामुळे टाकीत शेवाळ साचत नाही. विजेची बचत करण्यासोबतच, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून पाण्याची टाकी नेहमी छतावरच बसवणं फायद्याचं ठरतं.

44
घराच्या बांधकामाची सुरक्षितता
Image Credit : Instagram

घराच्या बांधकामाची सुरक्षितता

घराचं आयुष्य आणि सुरक्षिततेचा विचार केला, तरी खाली टाकी बांधणं धोकादायक ठरतं. जमिनीवर पाण्याची मोठी टाकी बांधली आणि भविष्यात थोडं जरी लीकेज झालं, तरी भिंतींना ओल पकडते. ही ओल हळूहळू पसरते आणि घराचा पाया तसेच पिलर्स कमकुवत करते.

यामुळे इमारतीचं आयुष्य तर कमी होतंच, पण भविष्यात दुरुस्तीसाठी मोठा खर्चही करावा लागतो. तीच टाकी जर छतावर असेल, तर घराच्या पायाला कोणतंही नुकसान होत नाही. त्यामुळे घराची सुरक्षितता लक्षात घेऊन छतावरच पाण्याची टाकी बांधण्याचा निर्णय नेहमी योग्य ठरतो.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Cheapest Prepaid Plans : जिओ, एअरटेल आणि Vi चे सर्वात स्वस्त व्हॅलिडिटी प्लॅन्स
Recommended image2
Dhanteras 2026 : धनत्रयोदशीला सोनं की चांदी? ग्राहकांचा कल कुठे?
Recommended image3
Jio Rs 15 Plan : रिलायन्स जिओचा धमाका! फक्त १५ रुपयात २४ तास अनलिमिटेड 5G डेटा
Recommended image4
Gold Rate Update : सोन्याचे दर का वाढतायत? 2 लाखांचा टप्पा पार करणार का?
Recommended image5
Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता 75 टक्के मार्क्स लागणार? जाणून घ्या नवे नियम
Related Stories
Recommended image1
Solar Power: घराघरात सौरऊर्जा, 'सूर्य घर' योजनेचा धुमाकूळ! रोज १६,००० हून अधिक घरांवर सोलर पॅनल
Recommended image2
Solar Kitchen : ना गॅस, ना वीज... तरीही रोज 50 हजार लोकांसाठी जेवण, हे कसं शक्य आहे?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved