- Home
- Utility News
- Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता 75 टक्के मार्क्स लागणार? जाणून घ्या नवे नियम
Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता 75 टक्के मार्क्स लागणार? जाणून घ्या नवे नियम
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता पासिंग मार्क्स ६०% वरून ७५% होणार का? केंद्र सरकारचे नवे प्रस्तावित नियम, ३० मिनिटांचं ट्रेनिंग, ब्लड ग्रुप, इमर्जन्सी नंबर आणि ऑनलाईन फी सवलतीबद्दल सविस्तर माहिती…

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल
केंद्र सरकार भारतात ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) मिळवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) वाहनचालकांची सुरक्षा आणि लायसन्सची प्रक्रिया सोपी करण्यासाठी काही नवे प्रस्तावित नियम आणले आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी आता ६० टक्क्यांऐवजी ७५ टक्के मार्क्स मिळवावे लागतील. त्यामुळे लायसन्स काढताना आता जास्त लक्ष द्यावं लागेल. हे नियम अजून लागू झालेले नाहीत, तर हा फक्त एक प्रस्ताव आहे.
१. पासिंग मार्क्स ६०% वरून ७५% होणार - ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होण्यासाठी आता ७५% मार्क्स लागतील. म्हणजे १०० पैकी ७५ मार्क्स मिळवणं गरजेचं असेल.
२. किमान ३० मिनिटांचं ट्रेनिंग - नव्या नियमानुसार ड्रायव्हिंग ट्रेनिंग किमान ३० मिनिटांचं असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
३. लायसन्सवर ब्लड ग्रुप अनिवार्य - नवीन किंवा रिन्यू केलेल्या लायसन्सवर आता तुमचा ब्लड ग्रुप (रक्तगट) छापणं अनिवार्य असेल. अपघाताच्या वेळी याचा खूप फायदा होईल.
४. मोबाईल नंबर आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट - लायसन्सवर आता तुमचा मोबाईल नंबर आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबरही असेल.
५. भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी वेगळे लायसन्स - भारतीय नागरिक आणि परदेशी लोकांसाठी लायसन्सचे डिझाईन वेगवेगळे असणार आहे.

महत्त्वाचे नियम जाणून घ्या
६. लायसन्स आता PVC कार्डवर मिळणार - नवीन किंवा रिन्यू केलेले लायसन्स आता 'फॉर्म ७' (Form 7) नुसार लॅमिनेटेड किंवा पॉलिव्हिनाईल क्लोराईड (PVC) कार्डवर दिले जातील. हे कार्ड जास्त काळ टिकते.
७. आधारद्वारे ऑनलाईन सेवांवर फी माफ - आधार ऑथेंटिकेशन वापरून ऑनलाईन सेवा घेतल्यास काही फी माफ करण्याचा प्रस्ताव आहे. नाव आणि पत्ता बदलण्यासाठी लागणारी फी सुद्धा रद्द केली जाऊ शकते.
८. नाव, पत्ता बदलण्याचे अर्ज १५ दिवसांत निकाली निघणार - लायसन्सवरील नाव किंवा पत्ता बदलण्यासाठी केलेल्या अर्जांवर अधिकाऱ्यांना १५ दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. अर्ज नाकारल्यास त्याचं कारणही सांगावं लागेल.
९. लायसन्ससाठी कोणती कागदपत्रे लागतील? - ओळख, वय आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, ई-रेशन कार्ड आणि जन्मदाखला वापरता येईल.
१०. ३० दिवसांत नोंदवता येतील हरकती - हे सर्व बदल सध्या फक्त प्रस्तावित आहेत. यावर सामान्य नागरिक आणि संस्था ३० दिवसांच्या आत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवू शकतात. त्यानंतरच केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल.

