MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Electric Scooter : काही ई-स्कूटर्सना लायसन्स का लागत नाही? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या

Electric Scooter : काही ई-स्कूटर्सना लायसन्स का लागत नाही? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ वाढतेय. पण काही इलेक्ट्रिक स्कूटर्स चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रजिस्ट्रेशनची गरज नसते, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटतं. पण यामागे नेमकं कारण काय आहे, याचा तुम्ही कधी विचार केलाय का?

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 09 2026, 03:38 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कमी वेगाच्या स्कूटर्सना लायसन्सची गरज नाही
Image Credit : Gemini AI

कमी वेगाच्या स्कूटर्सना लायसन्सची गरज नाही

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक स्कूटर्सची विभागणी त्यांच्या स्पीड आणि मोटरच्या क्षमतेनुसार केली आहे. ज्या स्कूटर्सचा वेग ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी असतो, त्या 'लो-स्पीड इलेक्ट्रिक व्हेईकल' प्रकारात येतात. त्यामुळे त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि RTO रजिस्ट्रेशनची गरज नसते. सरकार अशा गाड्यांना कमी धोकादायक मानते आणि म्हणूनच त्यांना विशेष सूट दिली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सरकारने ही सवलत का दिली?
Image Credit : Asianet News

सरकारने ही सवलत का दिली?

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणं, हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इंधनाचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार ईव्हीला प्रोत्साहन देत आहे. कमी वेगाच्या स्कूटर्स बहुतेक करून कॉलनी, शहरी भाग आणि कमी अंतराच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. त्यांचा वेग कमी असल्याने अपघाताची शक्यताही कमी असते, असं सरकारला वाटतं. म्हणूनच लोकांनी या गाड्या सहजपणे वापराव्यात यासाठी लायसन्सच्या नियमात सूट दिली आहे.

Related Articles

Related image1
Budget EV : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? किंमत आणि फीचर्स एकदा बघाच
Related image2
Honda QC3 Scooter : होंडाची नवी ई-स्कूटर, 151 किमी रेंज आणि भन्नाट फीचर्स; किंमत किती?
35
लायसन्स नसले तरी वाहतुकीचे नियम बंधनकारक
Image Credit : Google

लायसन्स नसले तरी वाहतुकीचे नियम बंधनकारक

ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, याचा अर्थ वाहतुकीचे नियम पाळायचे नाहीत, असं नाही. इलेक्ट्रिक स्कूटर असो किंवा कोणतंही वाहन, रस्त्यावरील सुरक्षेचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. गाडी चालवताना हेल्मेट घालणं, ट्रॅफिक सिग्नल पाळणं आणि वेगावर नियंत्रण ठेवणं यांसारखे नियम तुम्हाला पाळावेच लागतील.
45
हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी वेगळे नियम
Image Credit : Google

हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी वेगळे नियम

ही सूट सगळ्याच इलेक्ट्रिक स्कूटर्सना लागू होत नाही. ज्या हाय-स्पीड स्कूटर्सचा वेग ताशी २५ किलोमीटरपेक्षा जास्त असतो, त्यांना सामान्य गाड्यांप्रमाणेच नियम लागू होतात. अशा स्कूटर्ससाठी ड्रायव्हिंग लायसन्स, RTO रजिस्ट्रेशन, गाडीचा विमा आणि नंबर प्लेट असणं बंधनकारक आहे. हे नियम न पाळल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
55
विद्यार्थी आणि तरुणांना फायदा
Image Credit : Google

विद्यार्थी आणि तरुणांना फायदा

सरकारच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थी, नोकरदार आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना जास्त होत आहे. लायसन्स काढण्याचा वेळ आणि खर्च वाचवून ते कमी किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून वापरू शकतात. यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीलाही चालना मिळत आहे. पण, तज्ज्ञांच्या मते लायसन्सची सूट असली तरी सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नये.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
श्रावण महिन्यात करा १ ग्रॅमचे दागिने, डिझाईन पाहून पडाल प्रेमात
Recommended image2
BSNL Broadband : Jio-Airtel ला टक्कर! 999 रुपयांत 5000GB डेटा आणि OTT एकदम फ्री
Recommended image3
YouTube Monetization : आता पैसे कमावणं होणार अवघड, यूट्यूबने बदलले नियम
Recommended image4
Kia Sonet: गाडीवर ४५,००० रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट! ही SUV खरेदी करण्याची हीच का योग्य वेळ?
Recommended image5
Composting: घरातल्या कचऱ्यापासून बनवा जादुई खत, बागकाम होईल एकदम सोपं!
Related Stories
Recommended image1
Budget EV : टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? किंमत आणि फीचर्स एकदा बघाच
Recommended image2
Honda QC3 Scooter : होंडाची नवी ई-स्कूटर, 151 किमी रेंज आणि भन्नाट फीचर्स; किंमत किती?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved