हि वाहने बाजारात एकमेकांशी स्पर्धा करणार, जाणून घ्या माहिती
मारुती सुझुकी आपली पहिली इलेक्ट्रिक कार 'ई व्हिटारा' आणि टोयोटा आपली 'अर्बन क्रूझर ईव्ही' बाजारात आणत आहे. ही दोन्ही वाहने एकाच तंत्रज्ञानावर आधारित असली तरी, त्यांचे डिझाइन आणि फीचर्स वेगळे असतील, ज्यामुळे बाजारात त्यांच्यात स्पर्धा दिसेल.

हि वाहने बाजारात एकमेकांशी स्पर्धा करणार, जाणून घ्या माहिती
मारुती सुझुकी गाड्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असतात. ही दोन्ही वाहने एकाच तंत्रज्ञानावर आधारित आहेत, परंतु त्यांच्या डिझाइन आणि ब्रँडिंगमध्ये फरक असेल. बॅटरी, रेंज आणि प्लॅटफॉर्म समान असूनही, ही वाहने बाजारात एकमेकांशी स्पर्धा करतील.
मारुती सुझुकी ई व्हिटारा
मारुती सुझुकीने ई व्हिटारा गाडी मार्केटमध्ये आल्या आहेत. मारुतीची भारतातील ही पहिली इलेक्ट्रिक कार असेल. ही कार बर् याच काळापासून परदेशात निर्यात केली जात आहे आणि आता ती भारतातही लाँच केली जाणार आहे.
बॅटरी आणि पॉवर
बॅटरी पर्यायाबद्दल आपण या गाडीची जाणून घेऊयात. सुरुवातीच्या मॉडेलमध्ये म्हणजेच बेस व्हेरिएंटमध्ये 49 kWh बॅटरी मिळेल आणि ती 142 hp पॉवर आणि 192.5 Nm टॉर्क देईल. त्याच वेळी, टॉप मॉडेलमध्ये 61 kWh ची मोठी बॅटरी असेल आणि ती 172 hp पॉवर आणि 192.5 Nm टॉर्क देईल.
विशेष फीचर्स काय खास?
कंपनीने असा दावा केला आहे की, मोठी बॅटरी असलेले हे मॉडेल फुल चार्ज केल्यावर 543 किलोमीटरपर्यंत धावू शकेल. यामध्ये 10.25-इंच डिजिटल क्लस्टर, 10.1-इंच टचस्क्रीन, 18-इंच अलॉय व्हील्स, 10-वे पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि सुरक्षिततेसाठी 7 एअरबॅग्स यासारखी आधुनिक फीचर्स मिळतील.
टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही
टोयोटा कंपनीची अर्बन क्रुझर गाडी मार्केटमध्ये आली आहे. मारुतीच्या ई विटारावर आधारित हे मॉडेल आहे, परंतु त्याचा लूक अगदी वेगळा आणि प्रीमियम आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी यात अनेक फीचर्स देणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारचे डिझाइन.

