- Home
- Utility News
- टाटा सियाराचा सामना होणार हत्तीसारख्या गाड्यांशी, ताकदीने मजबूत आणि सुरक्षेत एक नंबर
टाटा सियाराचा सामना होणार हत्तीसारख्या गाड्यांशी, ताकदीने मजबूत आणि सुरक्षेत एक नंबर
टाटा कंपनीने नुकतीच सियारा ही गाडी बाजारात आणली आहे, जिला आता किया सेलटॉस, रेनॉल्ट डस्टर आणि निस्सान टेक्टॉन यांसारख्या आगामी दमदार गाड्यांकडून टक्कर मिळणार आहे. या स्पर्धेमुळे आगामी काही महिने SUV सेगमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

टाटा सियाराचा सामना होणार हत्तीसारख्या गाड्यांशी, ताकदीने मजबूत आणि सुरक्षेत एक नंबर
टाटा कंपनीने काही काळापूर्वी सियारा या गाडीचे मार्केटमध्ये लॉन्चिंग केलं आहे. मिनी सेगमेंटमध्ये आलेल्या या कारने आल्यावर लगेच धुमाकूळ उडवून दिला. आता टाटा सियाराला टक्कर द्यायला दुसऱ्या गाड्या मार्केटमध्ये येणार आहेत.
किया सेलटॉस
किया कंपनीची सेलटॉस हि गाडी नवीन रूपात आता परत एकदा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. १० डिसेंबरला हि गाडी मार्केटमध्ये येणार असून तिचा लूक एकदम दमदार असाच आहे. जीप कंपासपेक्षा हि गाडी मोठी आहे.
रेनॉल्ट डस्टर
SUV सेगमेंटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेली रेनॉल्ट डस्टर हि गाडी आता परत मार्केटमध्ये दाखल होणार आहे. जागतिक बाजारात हि गाडी आली असून २६ जानेवारीला भारतात येण्याची शक्यता आहे.
निस्सान टेक्टॉन
निस्सान टेक्टॉन हि गाडी आता मार्केटमध्ये दाखल होणार आहे. हि कार जून २०२६च्या दरम्यान भारतात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिझाईनची आकर्षक बाजू यामध्ये जमेची बाजू आहे.
टाटा सियाराचा सामना होणार
टाटा सियारा सध्या जबरदस्त चर्चेत आली आहे. किया, रेनॉल्ट आणि निसान या कंपन्यांसोबत मार्केटमध्ये या गाडीची स्पर्धा होणार आहे. आगामी काही महिने SUV गाड्यांसाठी महत्वाचे असणार आहे.

