प्रत्येकजण चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छितो. हा लेख एफडी आणि इक्विटी म्युच्युअल फंड या दोन प्रमुख गुंतवणूक पर्यायांची तुलना करतो. १० लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ वर्षांत कोणत्या पर्यायातून किती परतावा मिळू शकतो, याची माहिती यात दिली आहे.

प्रत्येकाला आपलं चांगलं भविष्य रहावं म्हणून गुंतवणूक करायची इच्छा असते. त्यासाठी ते विविध पर्याय चेक करून पाहतात. गुंतवणुकीमध्ये आपल्याला प्रत्येक महिन्यात छोटी छोटी रक्कम गुंतवायचा असतो. आपण याच पर्यायांची आता माहिती जाणून घेणार आहोत. एफडी या पर्यायांतून किती रुपये कमवू शकता ते पाहूयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

एफडीमध्ये किती गुंतवणूक करायला हवी? 

आपण जोखीम न घेता किती गुंतवणूक करायला हवी त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला सर्वात सोपा आणि चांगला पर्याय हा एफडीचा आहे. सध्या, अनेक बँका ५ वर्षांच्या एफडीवर सुमारे ६.५% ते ७.५% व्याजदर देतात. आपण जर १० लाख रुपये भरले तर त्यामधून आपल्याला १४ लाख रुपयांपर्यंत मिळू शकतात. त्यावर कर लागू शकतो.

एकरकमी गुंतवणुकीतून किती रुपये मिळू शकतात? 

जर हेच ₹10 लाख इक्विटी म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवले, आणि त्यावर सरासरी वार्षिक 12% परतावा मिळत असेल, तर 5 वर्षांत गुंतवणुकीतून अंदाजे ₹17.6 लाखांपर्यंत पोहोचू शकते. म्युच्युअल फंडाचा परतावा बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो आणि त्यात तोटा होण्याचीही शक्यता असते.