टाटा २०२६ला मार्केटमध्ये आणणार या कार्स, जाणून घ्या माहिती
टाटा मोटर्स २०२६ आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये अनेक नवीन गाड्या बाजारात आणणार आहे. यामध्ये पंच फेसलिफ्ट, नवीन जनरेशन नेक्सॉन (गरुड), हॅरियर (टॉरस), सफारी (लिओ) आणि कुनो व टेरा नावाच्या कॉम्पॅक्ट ईव्हीचा समावेश आहे, ज्या अद्ययावत फीचर्ससह येतील.

टाटा २०२६ला मार्केटमध्ये आणणार या कार्स, जाणून घ्या माहिती
टाटा कंपनी २०२६ मध्ये नवी गाड्या घेऊन येणार आहे. कंपनी या वर्षामध्ये नवीन कोणत्या गाड्या घेऊन येणार आहे, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Tata Punch
टाटा पंचचा फेसलिफ्ट व्हर्जन 2025 च्या अखेरीस बाजारात येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवीन डिझाइन आणि अपडेटेड फीचर्ससह हा लोकप्रिय सब-4 मीटर SUV आणखी आकर्षक बनवला जाणार आहे.
New-Gen Tata Nexon (Garud)
कोडनेम गरुड असलेल्या नेक्सॉनच्या पुढील पिढीला 2026 च्या दुसर्या भागात लॉन्च करण्याची योजना कंपनीकडून आखली जातआहे. हा मॉडेल अधिक शक्तिशाली, स्मार्ट फीचर्ससह मार्केटमध्ये येणार आहे.
Tata Harrier (Next Gen)
टाटा हॅरियरचं नवीन जनरेशन मॉडेल (कोडनेम Taurus) 2027 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. अद्ययावत डिझाइन, टेक्नॉलॉजी आणि सुरक्षा फीचर्ससह हा SUV आणखी प्रीमियम पॅकेजमध्ये येणार आहे.
Tata Safari (Next Gen)
Safari SUV चे नवीन जनरेशन (कोडनेम Leo) 2027 मध्ये इंडिया मध्ये दाखल होईल. मोठ्या इंटीरिअर, एडव्हान्स्ड फीचर्स आणि आरामदायी अनुभवासाठी डिझाइन केला गेलेला आहे.
Compact EVs — Kuno आणि Terra
टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक कार पोर्टफोलिओचा विस्तार करत Kuno आणि Terra नावाच्या कॉम्पॅक्ट EVs लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हे मॉडेल्स शहरी वापरासाठी परफेक्ट पर्याय ठरणार आहेत.

