- Home
- Utility News
- सोन्यावर कर्ज घेतलं आणि किंमत घसरली तर होईल पेटी, कर्जदार म्हणून 'हे' माहित असायलाच हवं
सोन्यावर कर्ज घेतलं आणि किंमत घसरली तर होईल पेटी, कर्जदार म्हणून 'हे' माहित असायलाच हवं
अनेकजण पैशांची गरज भागवण्यासाठी सोन्यावर कर्ज घेतात, ज्याची रक्कम सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते. सोन्याच्या दरात घट झाल्यास कर्जदाराला अतिरिक्त सोने किंवा रोख रक्कम द्यावी लागू शकते, म्हणूनच सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते.

सोन्यावर कर्ज घेतलं आणि किंमत घसरली तर होईल पेटी, कर्जदार म्हणून 'हे' माहित असायलाच हवं
पैशांची गरज भागवण्यासाठी असंख्य लोक सोन्याचे दागिने ठेवून कर्ज घेतात. हे कर्ज मिळवणे सोपे असले तरी प्रोसेस माहित असणे आवश्यक असते. सोन्याच्या दरावर परिणाम झाल्यावर कर्ज रकमेवर पूर्ण होतात.
सोन्याची मागणी कमी झाल्यास किंमती घसरतात
सोन्याच्या किंमती वाढत आहेत. सोन्याची किंमत वाढते, त्यावेळी कर्जाऊ घेतलेल्या रकमेचे मूल्य वाढत जातं. जागतिक बाजारात सुधारणा झाल्यास आणि सोन्याची मागणी कमी झाल्यास किमती घसरू शकतात.
सोन्याच्या किंमतीनुसार ७० ते ७५ टक्के देते कर्ज
सोन्याच्या किंमती कमी झाल्यास अतिरिक्त सोने आणि रोख रकमेची मागणी करू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 1 लाख रुपये किमतीचे सोने गहाण ठेवून 70 हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि नंतर सोन्याची किंमत 80 हजार रुपये झाली, तर तुमच्या 70 टक्के कर्जाची रक्कम केवळ 56 हजार रुपये होईल.
आज सोन्याचा भाव किती?
आज सोन्याचा भाव १,२६, ७१५ रुपये हा सोन्याचा भाव होता. सोन्याच्या दरात घसरण झाली असेल तर गुंतवणूक करण्याचा खूप चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळं आपण सोन्यात गुंतवणूक करू शकता.
सोन्यातली गुंतवणूक फायद्याची
सोन्यातली गुंतवणूक हि कायमच फायद्याची ठरत असते. आपण सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास वेळ आल्यावर आपल्याला त्याच सोन्यावर सोने तारण कर्ज मिळू शकते.

