One Plus 15T ची बॅटरी आठवडाभर टिकणार, अजून काय खास फीचर्स?
वन प्लस लवकरच आपला नवीन स्मार्टफोन वन प्लस १५ टी (OnePlus 15T) लाँच करणार आहे, ज्यामध्ये 7,500 mAh ची मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

One Plus 15T ची बॅटरी आठवडाभर टिकणार, अजून काय खास फीचर्स?
मोठ्या कंपन्या नवीन वर्षात फोन घेऊन मार्केटमध्ये येणार आहेत. आता कंपनी वन प्लस १५ टी हा फोन घेऊन येत आहे. या फोनची 6.3-इंचाचा डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.
फोनमध्ये काय असणार खास?
वन प्लस १५ टी 7,500 mAh बॅटरी कंपनीच्या वतीने देण्यात येणार आहे. या फोनमध्ये मेटल फ्रेम असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोनमध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 165 Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंचाचा LTPS डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.
कॅमेरा किती असणार?
येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा सॅमसंग कॅमेरा असू शकतो. पूर्वीच्या लीकवरून असे सूचित झाले होते की OnePlus 15T मध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ प्रोसेसर असू शकतो.
वन प्लस १५ आर आला मार्केटमध्ये
OnePlus 15R नुकताच भारतात लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K (2800×1272 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा व्हेरिएबल रिफ्रेश रेट 165 Hz पर्यंत आहे. डिस्प्ले क्रिस्टल शील्ड ग्लासने प्रोटेक्टेड करण्यात आला आहे.
अल्ट्रा वाईड कॅमेरा
OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर आहे आणि थर्मल मॅनेजमेंटसाठी ग्लेशियर व्हीसी कूलिंग सिस्टम आहे. स्मार्टफोनच्या ड्युअल रिअर कॅमेरा युनिटमध्ये 50-मेगापिक्सेल सोनी IMX906 प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.
बॅटरी किती?
सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोनची 7,400 mAh बॅटरी 80 W सुपर फ्लॅश चार्जिंग, 55 W PPS, बायपास पॉवर आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.

