भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत, माहिती घ्या जाणून
भारतात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. अनेकांना वाटते की EV महाग आहेत, पण टाटा टियागो EV, एमजी कॉमेट EV, आणि सिट्रोन eC3 सारखे अनेक परवडणारे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, जे शहरात रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत.
15

Image Credit : TATA MOTORS
भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणत्या आहेत, माहिती घ्या जाणून
भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. लोक आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे EV कडे जास्त पाहत आहे. पण खूप लोकांना अजूनही वाटतं की इलेक्ट्रिक कार महाग असते.
25
Image Credit : TATA MOTORS
Tata Tiago EV
टाटा कंपनीची Tiago EV सध्या भारतात सर्वात स्वस्त आणि जास्त विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये येते. याची किम्मत साधारण ₹8.69 लाख पासून सुरू होते. रेंजही चांगली मिळते, आणि शहरात रोजच्या वापरासाठी खूप योग्य आहे.
35
Image Credit : MG
MG Comet EV
- MG Comet EV ही खूप कॉम्पॅक्ट कार आहे. शहरात फिरायला सोपी, पार्किंग करणेही सोपी जाते. याची सुरुवातीची किंमत ₹6.99 लाख च्या आसपास आहे. जरी रेंज थोडी कमी आहे, तरी ऑफिस-कॉलेजसाठी एक परफेक्ट पर्याय म्हणून लोक घेत आहेत.
45
Image Credit : Google
Tata Tigor EV
जर कोणी सेडानसारखी इलेक्ट्रिक कार पाहत असले तर Tigor EV हा चांगला ऑप्शन आहे. किंमत अंदाजे ₹12.49 लाख पासून सुरू होते. रेंज जास्त मिळते आणि कुटुंबासाठीही comfortable कार आहे.
55
Image Credit : Google
सिट्रोन eC3
Citroen eC3 दिसायला मॉडर्न आहे आणि किमतीतही जास्त जड नाही. याची किंमत ₹11.50 लाख पासून सुरू होते. तिचा ड्रायव्हिंग अनुभव स्मूथ आहे आणि इंटेरियरही आकर्षक वाटत राहते.

