मटण लवकर शिजवायचंय? चविष्ट बनायला हवं. या सोप्या टिप्स नक्की वापरा
Mutton: अनेकांना चिकनपेक्षा मटण खायला आवडतं, पण मटण शिजवणं खूप कठीण वाटतं. कारण ते लवकर शिजत नाही. खूप वेळ वाट पाहावी लागते. पण काही सोप्या टिप्स वापरल्यास मटण झटपट शिजतं.

मटण
चिकनपेक्षा मटण खायला जास्त आवडतं, असं अनेक जण म्हणतात. पण चिकन शिजवण्याइतकं मटण शिजवणं सोपं नसतं. कारण मटण शिजायला खूप वेळ लागतो. पण काही सोप्या टिप्स वापरल्यास, मटण कमी वेळेत मऊ शिजेल आणि त्याची चव सुध्दा चांगली असेल.
मटण लवकर शिजण्यासाठी सोप्या टिप्स...
लहान तुकडे करा...
मटण शिजवताना त्याचे लहान तुकडे करावेत. असं केल्यामुळे मटण खूप लवकर शिजतं. यामुळे तुमचा स्वयंपाकाचा वेळ वाचतो.
मॅरिनेट करणे महत्त्वाचे...
जर तुम्हाला मटण लवकर शिजवायचे असेल, तर ते आधी मॅरिनेट करून ठेवा. यामुळे मटण चविष्ट तर होतंच, शिवाय ते खूप मऊ शिजतं. लिंबू, व्हिनेगर आणि दही यांसारख्या गोष्टी वापरून मॅरिनेट करणं खूप महत्त्वाचं आहे.
शिजवण्याची पद्धत...
मटण लवकर शिजवण्यासाठी जास्त तापमान वापरा. जास्त तापमानावर परतणे किंवा तळणे यासारख्या पद्धतींमुळे मांस लवकर शिजण्यास मदत होते. तुम्ही मटण शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करू शकता. प्रेशर कुकरमध्ये मटण खूप लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते.

