विवो कंपनीचा प्रीमियम फोन येणार मार्केटमध्ये, स्पेसिफिकेशन पाहून पडाल प्रेमात
विवो लवकरच X200T नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे, जो शक्तिशाली MediaTek Dimensity 9400+ चिपसेटसह येईल. या फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग असण्याची शक्यता आहे.

विवो कंपनीचा प्रीमियम फोन येणार मार्केटमध्ये, स्पेसिफिकेशन पाहून पडाल प्रेमात
विवो त्यांच्या X200 मालिकेअंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. त्याचे नाव विवो X200T असण्याची शक्यता आहे. याबद्दलची माहिती आधीच समोर आली आहे.
या फोनमध्ये काय असणार खास?
Vivo X200T मध्ये एक शक्तिशाली MediaTek Dimensity 9400+ चिपसेट असू शकतो. X200T कामगिरीच्या बाबतीत Vivo च्या टॉप फ्लॅगशिप फोनपैकी एक असू शकतो. फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे
फोन कधी येणार?
फोन जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा प्रीमियम फोन मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला ग्राहकांकडून कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच दिसून येईल.
कॅमेरा आणि चार्जिंगचे काय असणार स्पेसिफिकेशन?
Vivo X200T मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये तिन्ही सेन्सर 50MP आहेत. हे सेटअप फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी उत्कृष्ट ठरू शकते.
सॉफ्टवेअरच्या बाबतीत फोन ठरणार तगडा
सॉफ्टवेअर सपोर्टच्या बाबतीतही हा फोन खास ठरू शकतो. या फोनला जवळपास ५ महिन्यांचे अपडेट्स मिळणार असून ग्राहकांना हा फोन खरेदी करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरणार आहे.
चार्जिंग होणार फास्ट
ज्यांना शक्तिशाली कामगिरी, जलद चार्जिंग आणि मोठी बॅटरी लाइफ हवी आहे, परंतु कमी किंमत हवी आहे, त्यांच्यासाठी विवो X200T हा एक चांगला पर्याय असू शकतो. उत्तम फोटोग्राफीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम फोन देखील असू शकतो.

