भेसळयुक्त तुपात लाडू बनवल्याच्या वादानंतरही, येथील व्यंकटेश्वर मंदिराच्या पवित्र लाडू प्रसादाने विक्रीचा नवा विक्रम केला आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी एकाच दिवसात ५.१३ लाख लाडू विकले गेले. तर २०२५ मध्ये १३.५२ कोटी लाडू विकले गेले.
तिरूमला: भेसळयुक्त तुपात लाडू बनवल्याच्या वादानंतरही, येथील व्यंकटेश्वर मंदिराच्या पवित्र लाडू प्रसादाने विक्रीचा नवा विक्रम केला आहे. २०२५ मध्ये १३.५२ कोटी लाडू विकले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत १०% जास्त आहे. यासोबतच, २७ डिसेंबर २०२५ रोजी एकाच दिवसात ५.१३ लाख लाडू विकले गेले, जो दशकातील एका दिवसातील सर्वाधिक विक्रीचा विक्रम आहे, असे TTD ने म्हटले आहे.
लाडू विक्रीची आकडेवारी जाहीर
व्यंकटेश्वर मंदिराचे अधिकृत मंडळ असलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थानम (TTD) ने लाडू विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, २०२४ मध्ये १२.१५ कोटी लाडू विकले गेले होते. २०२५ मध्ये यात १०% म्हणजेच १.३७ कोटींची वाढ होऊन, विक्रीचा आकडा विक्रमी १३.५२ कोटींवर पोहोचला आहे.
लाडू विक्रीतून २०२५ मध्ये ६७६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असावे, असा अंदाज आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर वाढ:
२०२४ मध्ये आंध्र प्रदेशात सत्तेवर आलेले मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी, मागील जगनमोहन यादव यांच्या सरकारने लाडू बनवण्यासाठी डुक्कर, गाय आणि माशांच्या तेलाचे अंश असलेले भेसळयुक्त तूप वापरल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीही सुरू झाली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लाडू विक्रीत झालेली वाढ लक्षणीय आहे.


