तुम्ही UPI वापरता? 1 ऑगस्टपासून बदलतील पेमेंटचे हे नियम, आधीच जाणून घ्या
मुंबई - महाराष्ट्रात स्मार्टफोन नाही अशी व्यक्ती सापडणे जरा कठीण आहे. तसेच त्यातील अॅपही नित्याचेच झाले आहेत. त्यात युपीआयचा समावेश होतो. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) काही नवीन नियम लागू करणार आहे. जाणून घ्या…

बॅलन्स तपासण्यावर मर्यादा
सध्या PhonePe, Google Pay, Paytm सारख्या अॅप्समध्ये बँक बॅलन्स तपासण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. पण १ ऑगस्टपासून ही मर्यादा दिवसाला ५० वेळा इतकी असेल. सरसकट व्यवहारांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक अॅपमध्ये ५० वेळा बॅलन्स तपासता येईल हे दिलासादायक आहे.
ऑटोपे स्लॉटची वेळ निश्चित
OTT सबस्क्रिप्शन, गुंतवणूक अशा ऑटो डेबिट व्यवहार आता नॉन-पीक तासांमध्ये होतील. सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९:३० नंतर हे डेबिट होतील. त्यामुळे इतर वेळी पेमेंट लांबणार नाहीत.
न झालेल्या व्यवहाराची स्थिती ३ वेळाच तपासता येईल
तुमचे UPI पेमेंट प्रलंबित असेल, तर तुम्ही त्याची स्थिती फक्त ३ वेळाच तपासू शकता. प्रत्येक तपासणीमध्ये ९० सेकंदांचा अंतर असावा लागेल. हे देखील सध्याच्या सिस्टिमवरील भार कमी करण्यासाठी आहे.
गेल्या ६ महिन्यातील महत्त्वाचे बदल
* जून २०२५ मध्ये UPI API चा प्रतिसाद वेळ १५ सेकंदांवर आणला गेला. फसलेल्या व्यवहारांचा परतावा १० सेकंदात होतो.
* पेमेंट करण्यापूर्वी ज्यांना पैसे पाठवताय त्यांचे बँकेत नोंदणीकृत नाव दिसेल. ३० जूनपासून हे सुरू झाले आहे.
* डिसेंबर २०२४ च्या निर्णयानुसार, महिन्यातून १० वेळाच चार्जबॅक मागता येईल. एका व्यक्तीसाठी ५ वेळाच मर्यादित घालण्यात आली.
हे बदल का?
दरमहा १६ अब्ज UPI व्यवहार होतात. एप्रिल, मे मध्ये सर्व्हरच्या समस्या आल्या. UPI API वरील जास्त कॉल्स हे त्या मागचे कारण होते. बॅलन्सची अनावश्यक तपासणी, एकाच व्यवहाराची वारंवार तपासणी यामुळे समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे हे निर्णय घेतले आहेत.

