तुमच्या घरातल्या रिकाम्या हार्पिकच्या बाटल्या फेकून देताय? थांबा! या टाकाऊ बाटल्यांपासून तुम्ही आकर्षक प्लांटर, ऑर्गनायझर, DIY लॅम्प आणि मोबाईल होल्डरसारख्या अनेक सुंदर वस्तू बनवू शकता. जाणून घ्या घरच्या घरी करता येण्यासारख्या सोप्या आयडियाज.

Harpic Bottle Craft Ideas: बाथरूम साफ करण्यासाठी तुम्हीही हार्पिक वापरत असाल, पण बाटली रिकामी झाल्यावर तिचं काय करता? फेकून देता? पण थांबा... याच रिकाम्या हार्पिक बाटलीपासून तुम्ही काही हटके आणि क्रिएटिव्ह वस्तू बनवू शकता. या 'बेस्ट आउट ऑफ वेस्ट' आयडियाजमुळे तुमची क्रिएटिव्हिटी तर दिसेलच, पण घराला एक वेगळा आणि स्टायलिश लुकही मिळेल. चला, पाहूया हार्पिकच्या जुन्या बाटल्या वापरून कोणत्या क्रिएटिव्ह वस्तू बनवता येतात...

मिनी प्लांटर म्हणून वापरा

हार्पिकच्या बाटलीचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय वापर म्हणजे मिनी प्लांटर बनवणे. बाटली मधोमध कापा. खालच्या भागात माती भरून एखादं छोटं रोप लावा. तुम्ही याला तुमच्या आवडीचा रंग देऊन किंवा डिझाइन काढून अजून आकर्षक बनवू शकता. हा मिनी प्लांटर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा टेबलवर ठेवू शकता.

बाथरूम ऑर्गनायझर बनवा

हार्पिकच्या रिकाम्या बाटल्या स्वच्छ धुऊन तुम्ही त्याचा बाथरूम ऑर्गनायझर बनवू शकता. बाटलीला बाजूने कापून एक मोकळा कप्पा तयार करा. त्याच्या कडा घासून घ्या म्हणजे त्या लागणर नाहीत. हा ऑर्गनायझर तुम्ही भिंतीवर लावू शकता किंवा बेसिनजवळ ठेवू शकता. यात ब्रश, पेस्ट, रेझर अशा बाथरूममधल्या रोजच्या गरजेच्या वस्तू सहज राहतील.

स्टेशनरी होल्डर बनवा

हार्पिकच्या जुन्या बाटलीचा वापर करून तुम्ही मुलांसाठी स्टेशनरी होल्डरही बनवू शकता. बाटली अर्धी कापून घ्या. बाहेरून रंगीत कागद लावा किंवा रंग द्या. मग यात पेन, पेन्सिल, ब्रश, कात्री असं सगळं स्टेशनरीचं सामान व्यवस्थित ठेवा.

DIY लॅम्प म्हणून वापरा

घराला एक युनिक लुक देण्यासाठी तुम्ही हार्पिकच्या जुन्या बाटल्यांपासून DIY लॅम्प बनवू शकता. बाटलीवर एखादी डिझाइन कापून घ्या आणि आतमध्ये LED लाईटची छोटी माळ सोडा. बाहेरून ग्लिटर किंवा रंग लावल्यास रात्रीच्या वेळी हा एक सुंदर नाईट लॅम्प दिसेल.

मोबाईल होल्डर बनवा

हार्पिकच्या बाटलीचा वापर करून तुम्ही मोबाईल होल्डरसुद्धा बनवू शकता. बाटलीला 'U' आकारात कापून चार्जिंग प्लगजवळ अडकवण्यासाठी जागा ठेवा. फोन चार्ज करताना ठेवण्यासाठी हा एक स्मार्ट आणि कामाचा जुगाड आहे.

किचन किंवा स्टोरेज बॉक्स म्हणून वापरा

घरातल्या छोट्या-मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही हार्पिकच्या बाटलीपासून स्टोरेज बॉक्स बनवू शकता. बाटलीला मोठ्या आकारात कापून घ्या आणि वरच्या बाजूला एखादं झाकण किंवा कापड लावा. यात तुम्ही किचनमधले छोटे चमचे किंवा इतर लहानसहान वस्तू ठेवू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा - हार्पिकची बाटली पुन्हा वापरण्यापूर्वी ती आतून-बाहेरून पूर्णपणे स्वच्छ धुवा, नाहीतर हार्पिकचा वास आणि केमिकल त्यात राहू शकतं. बाटली कापताना धारदार कटरमुळे हाताला इजा होणार नाही याची काळजी घ्या. लहान मुलांसोबत क्राफ्ट बनवत असाल, तर मोठ्यांनीच बाटली कापण्याचं काम करावं. अशाप्रकारे, तुम्ही हार्पिकच्या जुन्या बाटलीचा वापर करून प्लांटर, ऑर्गनायझर, पेन स्टँड, लॅम्प अशा अनेक उपयोगी वस्तू बनवू शकता.