MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Bike Tyre Lifespan : तुमच्या बाईकचा टायर लवकर घासतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा, टेन्शन विसरा

Bike Tyre Lifespan : तुमच्या बाईकचा टायर लवकर घासतोय? या सोप्या टिप्स फॉलो करा, टेन्शन विसरा

बाईकच्या टायरचं आयुष्य कसं वाढवायचं आणि ते जास्त काळ कसे टिकतील, यासाठी कोणत्या सोप्या टिप्स फॉलो करायला हव्यात?

2 Min read
Author : Karishma R
Published : Sep 29 2026, 09:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
बाईकच्या टायरची काळजी घेण्यासाठी सुपर टिप्स
Image Credit : social media

बाईकच्या टायरची काळजी घेण्यासाठी सुपर टिप्स

बाईक रायडिंगची आवड असणाऱ्यांना लाँग ट्रिपला जायला खूप आवडतं. आजकाल अनेक तरुण ग्रुपने बाईक ट्रिपला जातात. गाडी चालवताना त्यांचं पूर्ण लक्ष फक्त डेस्टिनेशनवर असतं. पण, कोणत्याही रस्त्यावर गाडी व्यवस्थित चालवण्यासाठी टायर चांगल्या कंडिशनमध्ये असणं खूप गरजेचं आहे.

बाईकमध्ये टायर हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो, कारण तो थेट रस्त्याच्या संपर्कात येतो. त्यामुळे टायरची योग्य काळजी घेणं मस्ट आहे. तुमच्या बाईकचा टायर जास्त काळ टिकावा, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत:

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
योग्य हवेचा दाब
Image Credit : x

योग्य हवेचा दाब

बाईक कंपनीने दिलेल्या मॅन्युअलनुसार दोन्ही टायर्समध्ये हवा योग्य आहे की नाही, हे नेहमी तपासा. प्रत्येक बाईकचं टायर प्रेशर वेगळं असतं. मॅन्युअल वाचून पुढच्या आणि मागच्या टायरसाठी योग्य PSI पातळी जाणून घ्या.

सावलीत पार्क करा

शक्यतो बाईक सावलीत पार्क करा. थेट ऊन पडेल अशा ठिकाणी गाडी लावणं टाळा. उन्हामुळे टायरचं आयुष्य कमी होतं आणि त्याला तडे जाऊ शकतात. त्यामुळे बाईक कव्हरने झाकून ठेवा किंवा थंड ठिकाणी पार्क करा.

स्मूथ ड्रायव्हिंग

गाडी चालवताना अचानक वेग वाढवण्यासाठी एक्सलेटर जोरात फिरवू नका. यामुळे मागचं चाक वेगाने फिरतं आणि टायरचं रबर लवकर घासून खराब होतं. अचानक ब्रेक मारणंही चुकीचं आहे. नेहमी सुरक्षितपणे गाडी चालवा.

रस्त्याकडे लक्ष द्या

खराब किंवा ऑफ-रोड रस्त्यांवर गाडी चालवल्यास टायर्स लवकर घासले जातात. त्यामुळे शक्यतो चांगल्या आणि व्यवस्थित रस्त्यांवरच गाडी चालवा.

व्हील अलाइनमेंट तपासणे

मॅन्युअलमध्ये सांगितल्याप्रमाणे ठराविक वेळेनंतर दोन्ही चाकांचं व्हील अलाइनमेंट तपासून घ्या. अलाइनमेंट चुकीचं असेल तर टायरचं आयुष्य झपाट्याने कमी होतं.

Related Articles

Related image1
Top Selling Cars : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या? लोक याच कार्स का खरेदी करतात?
34
टायरच्या ग्रूव्ह्जकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं
Image Credit : AI

टायरच्या ग्रूव्ह्जकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं

टायरच्या वरच्या भागावरील डिझाईन (ग्रूव्ह्ज) एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त घासले गेले असतील, तर लगेच टायर बदलणं सुरक्षित ठरतं. पावसाळ्यात याच ग्रूव्ह्जमुळे बाईक रस्त्यावर घसरत नाही.

याशिवाय, आठवड्यातून किमान एकदा तरी टायरमध्ये खिळे, काचेचे तुकडे किंवा टोकदार दगड अडकले आहेत का, हे बारकाईने तपासा. टायरला छोटी छिद्रे असली तरी त्यातून हळूहळू हवा कमी होते आणि मोठा अपघात होण्याचा धोका असतो.

44
स्वच्छ करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा
Image Credit : Pixabay

स्वच्छ करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा

बाईकचे टायर्स स्वच्छ करताना जास्त केमिकल असलेले शॅम्पू वापरणं टाळा. यामुळे टायरचं रबर कडक होतं आणि त्याला तडे जाऊ शकतात. टायर्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साध्या पाण्याचा वापर करू शकता. या सोप्या टिप्स फॉलो केल्यास तुमच्या बाईकचे टायर्स जास्त काळ टिकतील आणि तुमचा प्रवासही सुरक्षित होईल.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स क्लेम करताना या चुका टाळा, नाहीतर पैसे अडकतील
Recommended image2
Adani Group SEBI : अदानी ग्रुपला मोठा दिलासा; सेबीने विनोद अदानी यांच्यावरील केस केली बंद
Recommended image3
Top Selling Cars : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या? लोक याच कार्स का खरेदी करतात?
Recommended image4
US High Paying Jobs : अमेरिकेत कोणत्या नोकऱ्यांना मिळतो सर्वाधिक पगार? भारतीयांसाठी टॉप 7 ऑप्शन्स
Related Stories
Recommended image1
Top Selling Cars : भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार कोणत्या? लोक याच कार्स का खरेदी करतात?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved