अ‍ॅमेझॉन प्राइम ते स्विगी वन मेंबरशिपर्यंत, या बँकेच्या ATM कार्डवर धमाकेदार ऑफर

| Published : Dec 24 2024, 08:01 AM IST

Image of  atm card

सार

युनियन बँकेच्या रुपे इलीट मेटल कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम ते स्विगी वन मेंबरशिपर्यंतच्या गोष्टींवर ग्राहकांना ऑफरचा लाभ घेता येणार आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...

Union Bank ATM Card : सध्याच्या काळात अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबर्सशिप किंवा स्विगी वन मेंबरशिपचा बहुतांशजणांकडून वापर केला जातो. याच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या ऑफर्स किंवा फ्री डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करुन दिला जातो. मात्र या सुविधांसाठी मेंबरशिप फी भरावी लागते. अशातच युनियन बँकेच्या रुपे इलीट मेटल कार्डच्या माध्यमातून त्यांच्या ग्राहकांना काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ते फूड डिलिव्हरीसह अन्य काही गोष्टींसाठी धमाकेदार ऑफर दिल्या जातात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

युनियन बँकेच्या रुपे इलीट मेटल कार्डचे फीचर्स

  • युनियन बँक ऑफ इंडिया किंवा दुसऱ्या बँकांच्या एटीएमचा अनलिमिटेड एक्सेस असतो.
  • एका दिवसात 2 लाख रुपयांपर्यंत पैसे काढता येऊ शकतात.
  • एका दिवसात POS ची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत आहे.
  • SMS साठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.
  • वर्षातून चार वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाउंज एक्सेस
  • वर्षाला चार वेळा मोफत आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लाउंज एक्सेस
  • प्रत्येक वर्षी अ‍ॅमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन मिळणार
  • BookMy Show वर प्रत्येक महिन्याला दोन तिकिटांच्या बुकिंगवर फ्लॅट 500 रुपयांची सूट मिळेल
  • एका आर्थिक वर्षात तीन महिन्यांसाठी Swiggy ची मेंबरशिप मिळणार
  • प्रत्येक तिमाहित ओला किंवा उबरचे 1 हजार रुपयांचे वाउचर
  • Make My Trip च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय किंवा देशाअंतर्गत विमानाच्या तिकिटांवर 10 टक्के सूट दिली जाईल. ही सूट प्रत्येक तिमाहित अधिकाधिक 1500 रुपये असेल.
  • ग्राहकांच्या सेवेसाठी हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, पंजाबी आणि 4 दाक्षिणात्य भाषांमध्ये 24X7 पर्सनल असिस्टेंट उपलब्ध असेल.
  • पर्सनल एक्सिडेंटल डेथ इन्शुरन्ससाठी बँकेकडून 5 लाख रुपये, एनपीसीआय/रुपे यांच्याकडून 10 लाख रुपये
  • कार्ड जारी करण्यासाठी शून्य शुल्क
  • कार्डसाठी वार्षिक शुल्क शून्य रुपये

कोणाला मिळणार हे कार्ड

डिजिटल प्लॅटफॉर्म टेक्नोफिनोचे फाउंडर सुमंत मंडल यांनी बँकेच्या कार्डबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, रुपे इलीट मेटल कार्ड खरंतर ग्राहकांना दिले जाते. पण यासाठी एक अट असून ज्यांचे वेतन 1.80 लाख किंवा त्याहून अधिक असावे. याशिवाय युनियन बँकेत सॅलरी अकाउंटही असावे. दरम्यान, बँकेकडून काही प्रकरणात कमी सॅलरी असणाऱ्या ग्राहकांनाही रुपे इलीट मेटल कार्ड दिले जाते.

आणखी वाचा : 

पॉपकॉर्नवरील GST: नवीन दर जाहीर, फ्लेवरनुसार कर

यूपीआय तक्रार: कशी करावी नोंद?