MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Cars Under 3 Lakhs : ३ लाखांच्या बजेटमध्ये पूर्ण करा स्वतःच्या कारचं स्वप्न.. पाहा हे भन्नाट ऑप्शन्स

Cars Under 3 Lakhs : ३ लाखांच्या बजेटमध्ये पूर्ण करा स्वतःच्या कारचं स्वप्न.. पाहा हे भन्नाट ऑप्शन्स

स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण नवी कार घेणं खूप महाग पडतं. म्हणूनच फक्त ३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही मस्त सेकंड हँड कार घेऊ शकता. मारुती अल्टो 800 पासून ते रेनॉल्ट क्विडपर्यंत अनेक ऑप्शन्स बाजारात उपलब्ध आहेत.

4 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 21 2026, 03:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
३ लाखांत कार मिळेल का? हे पाहा टॉप ५ ऑप्शन्स!
Image Credit : Asianet News

३ लाखांत कार मिळेल का? हे पाहा टॉप ५ ऑप्शन्स!

स्वतःची कार घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण नव्या कारची किंमत, इन्शुरन्स आणि ईएमआयचं टेन्शन खूप असतं. अशा वेळी सेकंड हँड कार्स हा एक बेस्ट ऑप्शन ठरतो. विशेषतः ३ लाखांच्या आत मिळणाऱ्या छोट्या कार्स तुम्ही सिटीत फिरण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी किंवा फॅमिलीसोबत जवळच्या ट्रिपसाठी वापरू शकता.

या बजेटमध्ये मारुती सुझुकी अल्टो 800, वॅगन आर, ह्युंदाई i10, रेनॉल्ट क्विड आणि ह्युंदाई इऑन सारखे मॉडेल्स मिळतात. कारचं मॅन्युफॅक्चरिंग इयर, किती किलोमीटर चालली आहे, कंडिशन आणि ओनरची संख्या यावर तिची किंमत ठरते. कार घेताना ती त्या किमतीला योग्य आहे की नाही, हे नक्की तपासून पाहा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
मारुती अल्टो 800 — कमी बजेटमधील बेस्ट चॉईस!
Image Credit : Pexels

मारुती अल्टो 800 — कमी बजेटमधील बेस्ट चॉईस!

अंदाजित किंमत: १.५ लाख ते ३ लाख रुपये

बजेटमध्ये कार घेणाऱ्यांसाठी मारुती सुझुकी अल्टो 800 हा पहिला ऑप्शन असतो. या कारची साईझ छोटी असल्याने सिटी ट्रॅफिकमध्ये चालवायला आणि छोट्या जागेत पार्क करायला ती खूप सोपी जाते. अल्टो 800 चं पेट्रोल मॉडेल रोजच्या प्रवासासाठी एकदम परफेक्ट आहे. मारुती सुझुकीचे सर्व्हिस सेंटर्स सगळीकडे सहज मिळतात आणि स्पेयर पार्ट्सही स्वस्त असतात, हा याचा मोठा प्लस पॉईंट आहे.

पहिल्यांदाच कार घेणारे, छोटी फॅमिली आणि सिटीत जास्त फिरणाऱ्यांसाठी ही कार बेस्ट आहे. पण स्वस्तात मिळतेय म्हणून डोळे झाकून घेऊ नका. इंजिन, क्लच, एसी, टायर्स, इन्शुरन्स आणि सर्व्हिस हिस्ट्री नीट तपासा. जुनी कार असल्याने तिची कंडिशन खूप महत्त्वाची असते.

Related Articles

Related image1
Bike Maintenance Tips : कितीही वर्षं झाली तरी तुमची बाईक नव्यासारखी चमकेल, फक्त या टिप्स फॉलो करा
Related image2
Kia Cars : किआ इंडियाचा नवा उच्चांक; सप्टेंबरमध्ये 32 हजारहून अधिक वाहनांची विक्री, ग्राहकांची मोठी पसंती
37
मारुती वॅगन आर — फॅमिलीसाठी परफेक्ट कार!
Image Credit : Pexels

मारुती वॅगन आर — फॅमिलीसाठी परफेक्ट कार!

अंदाजित किंमत: २.३ लाख ते ३ लाख रुपये

कार छोटी असली तरी आतमध्ये भरपूर स्पेस हवी असेल, तर मारुती सुझुकी वॅगन आर हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची डिझाईन थोडी उंच असल्याने कारमध्ये बसणं आणि उतरणं खूप सोपं जातं. ड्रायव्हर आणि पॅसेंजर्ससाठी कम्फर्टेबल सीटिंग आणि रोजच्या वापरासाठी पुरेशी केबिन स्पेस ही याची खासियत आहे.

फॅमिलीसोबत बाहेर जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी आणि सिटीत फिरण्यासाठी हे मॉडेल एकदम फिट बसतं. ३ लाखांच्या आत मिळणाऱ्या कारची कंडिशन आणि मॅन्युफॅक्चरिंग इयरनुसार किंमत बदलते. त्यामुळे या बजेटमध्ये जुनी कार पाहताना ती किती किलोमीटर चालली आहे, सर्व्हिस हिस्ट्री कशी आहे आणि काही अपघात झालाय का, हे नक्की तपासा.

47
ह्युंदाई i10 — कम्फर्टेबल प्रवासासाठी बेस्ट!
Image Credit : Unsplash

ह्युंदाई i10 — कम्फर्टेबल प्रवासासाठी बेस्ट!

अंदाजित किंमत: १.५ लाख ते ३ लाख रुपये

ह्युंदाई i10 ही सिटीतील प्रवासासाठी आणि छोट्या फॅमिलीच्या रोजच्या गरजांसाठी एकदम परफेक्ट हॅचबॅक कार आहे. या कारचा केबिन कम्फर्ट, सोपी ड्रायव्हिंग आणि प्रॅक्टिकल डिझाईन अनेकांना आवडते.

या बजेटमध्ये तुम्हाला i10 चे जुने मॉडेल्स मिळू शकतात. काही जुन्या मॉडेल्समध्ये ऑटोमॅटिक गिअरचा ऑप्शनही मिळू शकतो. पण फक्त ऑटोमॅटिक गिअर आहे म्हणून घाईघाईत कार घेऊ नका. मेकॅनिककडून गिअरबॉक्सची कंडिशन नक्की तपासून घ्या.

कार घेण्यापूर्वी एसी, सस्पेन्शन, क्लच किंवा गिअरबॉक्स आणि इंजिनची कंडिशन तपासा. जुन्या कारमध्ये निघणाऱ्या रिपेअरिंगच्या कामाला किती खर्च येईल, याचाही आधीच अंदाज घ्या.

57
रेनॉल्ट क्विड — कमी बजेटमधील स्टायलिश कार!
Image Credit : renault

रेनॉल्ट क्विड — कमी बजेटमधील स्टायलिश कार!

अंदाजित किंमत: २.२ लाख ते ३ लाख रुपये

कार छोटी हवी आणि तिचा लूकही स्टायलिश असावा, असं वाटणाऱ्यांसाठी रेनॉल्ट क्विड हा बेस्ट ऑप्शन आहे. एसयूव्हीसारखा लूक, उंच डिझाईन आणि सिटीतील प्रवासासाठी योग्य साईझ हे याचे मुख्य हायलाईट्स आहेत. सेकंड हँड मार्केटमध्ये क्विडचे काही जुने मॉडेल्स ३ लाखांच्या आत सहज मिळतात.

पण फक्त किंमत पाहून निर्णय घेऊ नका. कारची सर्व्हिस हिस्ट्री, इंजिन कंडिशन, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स आणि स्पेयर पार्ट्स मिळण्याची शक्यता याबद्दल माहिती काढा. तुमच्या घराजवळ ऑथराईज्ड सर्व्हिस सेंटर आहे की नाही, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. ओनरकडून डॉक्युमेंट्स घ्या आणि मेकॅनिकला दाखवल्यानंतरच फायनल निर्णय घ्या.

67
ह्युंदाई इऑन — सिटी राईड्ससाठी परफेक्ट छोटी कार!
Image Credit : Pexels

ह्युंदाई इऑन — सिटी राईड्ससाठी परफेक्ट छोटी कार!

अंदाजित किंमत: १.८ लाख ते ३ लाख रुपये

३ लाखांच्या आत मिळणारी आणखी एक छोटी कार म्हणजे ह्युंदाई इऑन. सिटीत फिरण्यासाठी आणि छोट्या जागेत पार्क करण्यासाठी ही कार एकदम फिट बसते. बजेटमध्ये पहिली कार घेणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. इऑनचे मॉडेल्स बऱ्याच वर्षांपूर्वी मार्केटमध्ये आले होते, त्यामुळे आता मिळणाऱ्या कार्स थोड्या जुन्या असू शकतात. म्हणूनच किमतीपेक्षा कारच्या सध्याच्या कंडिशनला जास्त महत्त्व द्या.

इंजिन, क्लच, एसी, सस्पेन्शन आणि टायर्स चेक करण्यासोबतच.. कारचा काही अपघात झालाय का किंवा ती पुरात बुडाली होती का, याचीही चौकशी करा. तसेच कारची आरसी, इन्शुरन्स आणि ओनरशिप डॉक्युमेंट्स बरोबर आहेत की नाही, हे तपासा. स्वस्तात घेतलेली कार नंतर रिपेअरिंगच्या नावाने खिशाला कात्री लावणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.

77
सेकंड हँड कार घेण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा!
Image Credit : Unsplash

सेकंड हँड कार घेण्यापूर्वी या ५ गोष्टी लक्षात ठेवा!

३ लाखांत कार मिळतेय म्हणून घाईघाईत खरेदी करू नका. जुनी कार निवडताना तिची कंडिशन, डॉक्युमेंट्स आणि भविष्यातील मेंटेनन्सचा खर्च नक्की तपासा.

१. सर्व्हिस हिस्ट्री: कार नीट मेंटेन केली आहे की नाही आणि सर्व्हिस रेकॉर्ड्स आहेत का, हे तपासा.

२. अपघात आणि पुराचा धोका: कारचा बाहेरचा लूक पाहून फसू नका. कारची बॉडी, अंडरबॉडी आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम्स मेकॅनिककडून तपासून घ्या.

३. डॉक्युमेंट्स: आरसी, इन्शुरन्स, पीयूसी, लोन बॅलन्स आणि ओनरचे डिटेल्स नीट तपासा.

४. टेस्ट ड्राईव्ह: कार चालवून पाहा आणि इंजिन, ब्रेक्स, क्लच, गिअरबॉक्स, एसी आणि टायर्सची कंडिशन समजून घ्या. शक्य असल्यास ओळखीच्या मेकॅनिकला सोबत घेऊन जा.

५. अतिरिक्त खर्च: कारच्या किमतीसोबतच ओनरशिप ट्रान्सफर, इन्शुरन्स, रिपेअरिंग आणि लगेच बदलावे लागणारे स्पेयर पार्ट्स यांचा खर्चही लक्षात घ्या.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ॲडव्हान्स देऊ नका. तुमचं संपूर्ण बजेट फक्त कार घेण्यावरच खर्च करू नका, अचानक निघणाऱ्या रिपेअरिंगसाठी थोडे पैसे बाजूला ठेवा. ३ लाखांच्या आत एक चांगली सेकंड हँड कार नक्की मिळू शकते. पण कोणतं मॉडेल घेतोय यापेक्षा.. ती कार कोणत्या कंडिशनमध्ये आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(31.4 ov)66/6
Day 4 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Coal Shortage : भारत अंधारात बुडणार? 96 औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा
Recommended image2
Rich People Investments : श्रीमंत लोक पैसे कसे वाढवतात? जाणून घ्या ५ भन्नाट मार्ग!
Recommended image3
ChatGPT Retirement Planning : पगार 70 हजार, वयाच्या 42व्या वर्षी निवृत्तीचं स्वप्न; ५ कोटींसाठी ChatGPT चं गणित काय?
Recommended image4
Jio IPO : जिओचा आयपीओ अवघ्या १०० मिनिटांत फुल्ल, गुंतवणूकदारांच्या उड्या; जाणून घ्या सविस्तर
Recommended image5
SBI Data Breach : एसबीआय ग्राहकांना मोठा धक्का! डार्क वेबवर 3898 जणांचा डेटा लीक
Related Stories
Recommended image1
Bike Maintenance Tips : कितीही वर्षं झाली तरी तुमची बाईक नव्यासारखी चमकेल, फक्त या टिप्स फॉलो करा
Recommended image2
Kia Cars : किआ इंडियाचा नवा उच्चांक; सप्टेंबरमध्ये 32 हजारहून अधिक वाहनांची विक्री, ग्राहकांची मोठी पसंती
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved