चक्क 3 दिवसांची सलग सुट्टी! विद्यार्थी, बॅंका आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!
मुंबई - सप्टेंबर म्हणजेच पुढच्या महिन्यात सलग ३ दिवस सुट्टीचा योग येत आहे. विद्यार्थी, बॅंका आणि सरकारी कर्मचारी यांना सुवर्णसंधी चालून आली आहे. तीन दिवस सुट्यांचा लाभ त्यांना मिळणार आहे.

सुट्टी आणि आनंद
सुट्टीचे दिवस आले की लोकांना थोडा आराम मिळतो. त्यामुळे उरलेल्या दिवसांत ते ताजेतवाने होऊन काम करू शकतात. आठवड्यातून एक दिवस सुट्टी मिळाली तरी लोक शांतपणे विश्रांती घेतात. पण जर सलग दोन-तीन दिवसांची सुट्टी मिळाली तर आनंद दुप्पट होतो. अशावेळी बाहेर फिरायला किंवा नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळते. आता पुन्हा सलग तीन दिवस सुट्टी येत असल्यामुळे विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी यांना विश्रांतीची किंवा गणेश विसर्जनात उत्साहाने सहभागी होण्याची संधी चालून आली आहे.
जून, जुलैमध्ये निराशा
जून महिन्यात शाळा सुरू झाल्या, पण त्या महिन्यात सुट्ट्या नव्हत्या. जुलैमध्येही फारशा सुट्ट्या मिळाल्या नाहीत. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिन, आणि आता बुधवारी, म्हणजेच २७ तारखेला गणेश चतुर्थीची सुट्टी आहे.
सप्टेंबरमध्ये आनंदी आनंद
विद्यार्थी आणि सरकारी कर्मचारी आनंदी आहेत, कारण सप्टेंबरमध्ये सलग सुट्ट्या येत आहेत. ५ सप्टेंबरला मिलाद उन नबी आहे. त्यानिमित्ताने राज्यात सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार ६ सप्टेबरला अनंत चर्तुदशी आणि ७ सप्टेंबरला रविवारची सुट्टी आहे. म्हणजेच सलग ३ दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे लोक आतापासूनच या दिवसांचे प्लानिंग करत आहेत.
गणेश विसर्जनाच्या धामधुमीत बाहेरची वाट
गणेश विसर्जनाचा दिवस म्हटला की ठिकठिकाणी डिजेचा दणदणात ऐकायला येतो. आणि रस्ते तर गर्दीने ओसंडून वाहतात. त्यामुळे काही जण या दिवशी शहराबाहेर राहणेच पसंत करतात. त्यांच्यासाठी ३ दिवसांची सुटी म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची आयती संधीच चालून आली आहे.

