सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातल्या त्यात तरुणी आपल्या त्वचेची काळजी घेतानाही चिंतेत दिसतात. अशावेळी काही बिया या त्वचेच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून तुम्हाला त्यांची मदत होऊ शकते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपले आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातल्या त्यात तरुणी आपल्या त्वचेची काळजी घेतानाही चिंतेत दिसतात. अशावेळी काही बिया या त्वचेच्या आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून तुम्हाला त्यांची मदत होऊ शकते. त्वचेसाठी पाच वेगवेगळ्या बियांचे आवश्यक फायदे काय आहेत, याबद्दल त्वचाशास्त्रज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी माहिती दिली आहे. डॉ. जुश्या यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्वचेच्या आरोग्यासाठी बियांचे महत्त्व सांगितले आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या, हे जाणून घेऊयात.
जवस -
ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर असल्याने, जवस मुरुमे असलेल्या आणि त्वचा लालसर व सुजलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. जवसाच्या बिया सॅलड किंवा स्मूदीमध्ये घालून खाऊ शकता.
चिया सीड्स -
अँटीऑक्सिडंटने भरपूर असलेल्या चिया सीड्स निस्तेज त्वचा आणि अकाली वृद्धत्व रोखण्यास मदत करतात. चिया सीड्स पाण्यात किंवा सॅलडमध्ये घालून खाऊ शकता.
भोपळ्याच्या बिया -
झिंक भरपूर असलेल्या भोपळ्याच्या बिया विशेषतः तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उपयुक्त आहेत. इतकेच नाही तर कोंडा कमी करण्यासाठीही त्या मदत करतात.
सूर्यफुलाच्या बिया -
व्हिटॅमिन ई भरपूर असलेल्या सूर्यफुलाच्या बिया त्वचेचा अडथळा दूर करून नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात.
तीळ -
लिग्नॅन्स आणि सेलेनियम असलेले तीळ त्वचा सुंदर बनवण्यासाठी आणि तिची लवचिकता सुधारण्यासाठी चांगले आहेत.
डॉ. जुश्या भाटिया सांगतात की, जवसाच्या बियांपासून ते सूर्यफुलाच्या बियांपर्यंत, सर्व ओमेगा-३, झिंक, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत - हे सर्व घटक त्वचेला चमकदार बनवतात. तथापि, आहारात मूठभर बियांचा समावेश करण्यापूर्वी त्यांचे फायदे आणि तोटे याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही त्या देतात.


