Tata Harrier and Safari Petrol Variants Launched : टाटा मोटर्सने हॅरियर आणि सफारीचे नवीन पेट्रोल व्हेरिएंट्स भारतीय बाजारात सादर केले आहेत. 1.5-लिटर टर्बो-GDi पेट्रोल इंजिन असलेल्या या एसयूव्ही उत्तम परफॉर्मन्स आणि मायलेज देतात.
Tata Harrier and Safari Petrol Variants Launched : टाटा मोटर्सने भारतीय बाजारात हॅरियर आणि सफारीचे पेट्रोल व्हेरिएंट्स लाँच केले आहेत. टाटा हॅरियर पेट्रोलची एक्स-शोरूम किंमत 12.89 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टाटा सफारी पेट्रोलची किंमत 13.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
या दोन्ही एसयूव्हीमध्ये टाटाचे नवीन 1.5-लिटर हायपेरियन टर्बो-GDi पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 170 PS पॉवर आणि 280 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन पेट्रोल मॉडेल्स सेगमेंटमध्ये सर्वोत्तम मायलेज देतात. टाटा हॅरियर पेट्रोलने 12 तासांच्या ड्राइव्हमध्ये पेट्रोल मॅन्युअल एसयूव्हीसाठी सर्वाधिक मायलेज मिळवल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही स्थान मिळवले आहे.
परफॉर्मन्स आणि वैशिष्ट्ये
नवीन इंजिनमुळे हॅरियर आणि सफारीचा परफॉर्मन्स अधिक स्मूथ झाला आहे आणि नॉईज, व्हायब्रेशन आणि हार्शनेस (NVH) पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. या एसयूव्हीमध्ये पूर्वीप्रमाणेच प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतात. या अपडेटमुळे, दोन्ही एसयूव्ही लोकप्रिय पेट्रोल-पॉवर्ड एसयूव्हीशी थेट स्पर्धा करतील.

फीचर हायलाइट्स
नवीन अपडेटसह मिळालेली सर्व वैशिष्ट्ये हॅरियर आणि सफारीच्या पेट्रोल इंजिनमध्येही काही नवीन बदलांसह मिळतात. यामध्ये मोठी 36.9 सेमी इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट असलेली ऑडिओ सिस्टीम, बिल्ट-इन डॅशकॅमसह डिजिटल रिअर-व्ह्यू मिरर, रिव्हर्स असिस्टसह मेमरी ORVMs आणि ड्युअल-कॅमेरा वॉशर सिस्टीम यांचा समावेश आहे. दोन्ही एसयूव्हीमध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि स्लायडिंग फ्रंट आर्मरेस्ट, व्हॉईस असिस्टंटसह बिल्ट-इन नेव्हिगेशन यांसारखी आरामदायी वैशिष्ट्येही मिळतात.
फाईव्ह-स्टार सुरक्षा रेटिंग
नवीन पेट्रोल इंजिन असलेल्या हॅरियर आणि सफारीच्या सर्व व्हेरिएंट्सना इंडिया NCAP कडून फाईव्ह-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. यामुळे पेट्रोल मॉडेल्स सुरक्षेच्या बाबतीत डिझेल व्हेरिएंट्सच्या बरोबरीने आले आहेत. या एसयूव्हीमध्ये 22 सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असलेली लेव्हल-2 ADAS सिस्टीम पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर, सफारी पेट्रोल: व्हेरिएंट्स
टाटा हॅरियर पेट्रोल इंजिन स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फिअरलेस या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. निवडक व्हेरिएंट्समध्ये डार्क आणि रेड डार्क एडिशन देखील मिळतील. टाटा सफारी पेट्रोल इंजिन स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि अॅकम्प्लिश्ड या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. हे 6-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टॉप व्हेरिएंट्समध्ये डार्क आणि रेड डार्क एडिशन देखील उपलब्ध आहेत.


