Tata Curvv and Curvv EV 2024 : टाटा मोटर्सने आपली कर्व आणि कर्व ईव्ही मॉडेल्स नवीन प्रीमियम वैशिष्ट्ये आणि आकर्षक ललितपूर ग्रे इंटीरियर थीमसह अपडेट केली आहेत. जाणून घ्या फिचर्स.

Tata Curvv and Curvv EV 2024 : टाटा म्हटले की भारतीयांचा भरोसा. टाटा मोटर्सने आपली लोकप्रिय वाहने कर्व आणि कर्व ईव्ही पुन्हा नव्या रूपात सादर केली आहेत. या कार्समध्ये आता अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये आणि आकर्षक इंटीरियर थीम देऊन सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्सचा लूक आणि वैशिष्ट्ये कैकपटींनी वाढली आहेत. टाटाने कूप-एसयूव्ही सेगमेंटला एका नवीन स्तरावर नेले आहे. स्टाईल आणि आरामदायीपणाची आवड असणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय बनला आहे. त्यामुळे या दोन कारची पुन्हा बाजारपेठेत पकड तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन टाटा कर्वचे केबिन आता पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम दिसते. यात एक नवीन ललितपूर ग्रे इंटीरियर थीम समाविष्ट आहे, जी डॅशबोर्डवर पांढऱ्या कार्बन फायबर इन्सर्ट्स आणि बेनेके-कॅलिको लेदरेट अपहोल्स्ट्रीसह एक आलिशान लुक देते.

टाटाने मागील सीटवरील प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष लक्ष दिले आहे. कर्वमध्ये आता मागील आर्मरेस्टमध्ये इंटिग्रेटेड कप होल्डर्स, मागील सनशेड्स, व्हेंटिलेटेड मागील सीट्स आणि ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. तर कर्व ईव्हीमध्ये मागील सह-प्रवाशांसाठी फूटरेस्ट आणि अर्गोविंग हेडरेस्ट आहे, जे लांबच्या प्रवासात अतिरिक्त आराम देतात.

हे आहेत आकर्षक फिचर्स

नवीन कर्व लाइनअप सध्याच्या तीन इंजिन पर्यायांसह सुरू आहे. यात 1.2-लिटर डायरेक्ट-इंजेक्शन टर्बो पेट्रोल, 1.2-लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन यांचा समावेश आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत. तर, कर्व ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते - 45 kWh आणि 55 kWh व्हेरिएंट. हे उत्तम रेंज आणि परफॉर्मन्स देतात.

जाणून घ्या किंमत

नवीन कर्वची ही अद्ययावत वैशिष्ट्ये आता तिच्या अकंप्लिश्ड ट्रिममध्ये उपलब्ध आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 14.55 लाख रुपयांपासून सुरू होते. इलेक्ट्रिक मॉडेल असलेल्या कर्व ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 18.49 लाख रुपयांपासून सुरू होते.