MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Swiggy Report : बिर्याणीलाच पसंती! मिनिटाला तब्बल 200 ऑर्डर्स... रिपोर्टमधून उघड

Swiggy Report : बिर्याणीलाच पसंती! मिनिटाला तब्बल 200 ऑर्डर्स... रिपोर्टमधून उघड

Swiggy Report : भारतीयांच्या खवय्येगिरीची कल्पना तर सर्वांनाच आहे. त्यात बिर्याणीची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगायला नको. 2025 च्या ऑनलाइन ऑर्डर्समध्ये बिर्याणीने धुमाकूळ घातला आहे. स्विगीने जाहीर केलेल्या रिपोर्टमधून अशा गोष्टी समोर आल्या आहेत. 

2 Min read
Marathi Desk 1
Published : Dec 24 2025, 04:51 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
देशभरात बिर्याणीची जबरदस्त क्रेझ
Image Credit : Generated by google gemini AI

देशभरात बिर्याणीची जबरदस्त क्रेझ

देशात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असले तरी खवय्यांची पहिली पसंती बिर्याणीलाच आहे. बर्गर, पिझ्झा आणि डोसा लोकप्रिय होत असले तरी, ऑनलाइन ऑर्डर्समध्ये बिर्याणीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसते. प्रमुख फूड डिलिव्हरी ॲप स्विगीने आपल्या 2025 च्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. या वर्षी एकूण 9.3 कोटी बिर्याणी ऑर्डर्सची नोंद झाली.

25
मिनिटाला शेकडो ऑर्डर्स
Image Credit : Getty

मिनिटाला शेकडो ऑर्डर्स

ऑनलाइन ग्राहकांकडून सर्वाधिक मागणी असलेला पदार्थ म्हणजे बिर्याणी. स्विगीच्या अंदाजानुसार, मिनिटाला सरासरी 194 बिर्याणी ऑर्डर्स येतात. यामध्ये चिकन बिर्याणी आघाडीवर असून, नुसत्या चिकन बिर्याणीला 5.77 कोटी ऑर्डर्स मिळाल्या.

Related Articles

Related image1
Easy Egg Biryani Recipe : केवळ 15 मिनिटांत बनवा हॉटेलसारखी अंडा बिर्याणी!
Related image2
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा टेस्टी मटण बिर्याणी दालचा, बोटं चाटत राहाल
35
फास्ट फूडची टॉप लिस्ट
Image Credit : Getty

फास्ट फूडची टॉप लिस्ट

बिर्याणीनंतर फास्ट फूडला मोठी मागणी दिसून आली. या वर्षी बर्गरसाठी 4.42 कोटी ऑर्डर्स आल्या, तर पिझ्झाच्या ऑर्डर्स 4.01 कोटींवर पोहोचल्या. पारंपरिक डोसाही मागे नाही. त्याला 2.62 कोटी ऑर्डर्स मिळाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

45
प्रादेशिक पदार्थांना वाढती पसंत
Image Credit : Getty

प्रादेशिक पदार्थांना वाढती पसंत

स्थानिक पदार्थांबद्दल लोकांमध्ये आवड वाढत आहे. डोंगराळ भागातील पदार्थांच्या ऑर्डर्स नऊ पटींनी वाढल्याचे स्विगीने म्हटले आहे. मलबारी, राजस्थानी, मालवणी यांसारख्या प्रादेशिक पदार्थांच्या ऑर्डर्स दुप्पट झाल्या आहेत. दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीच्या जेवणाच्या वेळी जास्त ऑर्डर्स येत असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. परदेशी पदार्थांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. मेक्सिकन पदार्थांना 1.6 कोटी, तिबेटी पदार्थांना 1.2 कोटी आणि कोरियन फूडला 47 लाख ऑर्डर्स मिळाल्या.

55
विक्रमी स्तरावरील ऑर्डर्स
Image Credit : Getty

विक्रमी स्तरावरील ऑर्डर्स

ऑनलाइन ऑर्डर्समध्ये काही मनोरंजक घटना घडल्या आहेत. हैदराबादमधील एका ग्राहकाने एकाच वेळी 47 हजार रुपये किमतीचे 65 बॉक्स ड्रायफ्रूट बिस्किटे ऑर्डर केली. मुंबईतील एकाने या वर्षी एकूण 3 हजार वेळा ऑर्डर करून विक्रम केला आहे. म्हणजेच, त्याने दिवसाला सरासरी नऊ ऑर्डर्स दिल्या, असे स्विगीने सांगितले. देशभरात हा सर्वाधिक आकडा असल्याचेही म्हटले आहे.

About the Author

MD
Marathi Desk 1
फूड न्यूज

Recommended Stories
Recommended image1
पुणे म्हाडा लॉटरीला आचारसंहितेचा मोठा फटका! २ लाख पुणेकरांचे घराचे स्वप्न लांबणीवर; आता 'या' तारखेलाच निघणार सोडत
Recommended image2
Home Tips : घरीच साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबीर लावा, हा आहे वाढीचा योग्य हंगाम
Recommended image3
२ हजारात मिळेल बेस्ट रूम हिटर, पर्याय घ्या जाणून
Recommended image4
मटण लवकर शिजवायचंय? चविष्ट बनायला हवं. या सोप्या टिप्स नक्की वापरा
Recommended image5
हिवाळ्यात गाजराचा गोड हलवा बनवा, सोबत या ४ पदार्थांची टेस्ट पहा चाखून
Related Stories
Recommended image1
Easy Egg Biryani Recipe : केवळ 15 मिनिटांत बनवा हॉटेलसारखी अंडा बिर्याणी!
Recommended image2
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखा टेस्टी मटण बिर्याणी दालचा, बोटं चाटत राहाल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved