Smartphone : झोपण्यापूर्वी फोन वापरणे थांबवा, शरीरात दिसतील 4 मोठे बदल
How To Get Natural Sleep Without Phone: रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल पाहणे सोडल्यास शरीरात कोणते आश्चर्यकारक बदल होतात? नैसर्गिक झोप लागण्यापासून ते मानसिक ताण कमी होण्यापर्यंत अनेक फायदे मिळतात.
14

Image Credit : Asianet News
How To Get Natural Sleep Without Phone
आपण सर्वजण स्मार्टफोनवर खूप अवलंबून आहोत. रात्री अंथरुणात पडून स्क्रीन पाहिल्याने शरीराच्या नैसर्गिक घड्याळावर वाईट परिणाम होतो. डॉक्टरांच्या मते, झोपण्याआधी फोन दूर ठेवल्यास शरीर स्वतःच रिलॅक्स होते.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : our own
मोबाईल स्क्रीनची 'ब्ल्यू लाईट'
आपल्या मेंदूतील पाइनल ग्रंथी अंधार झाल्यावर 'मेलाटोनिन' नावाचे संप्रेरक तयार करते, ज्यामुळे शांत झोप येते. पण मोबाईल स्क्रीनची 'ब्ल्यू लाईट' अजूनही दिवसच आहे असा चुकीचा संदेश मेंदूला पाठवते. यामुळे मेलाटोनिनचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत घटते. फोन बाजूला ठेवल्यास गोळ्यांशिवाय नैसर्गिक शांत झोप लागते. तसेच सोशल मीडियावरील नकारात्मक गोष्टींमुळे वाढणारा 'कोर्टिसोल' हा स्ट्रेस हार्मोनही कमी होतो.
34
Image Credit : Getty
हार्मोन्सचे संतुलन बिघडते
आपल्या भूकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या 'लेप्टिन' आणि 'घ्रेलीन' या हार्मोन्सचे संतुलन रात्री फोन पाहिल्याने बिघडते. म्हणूनच रात्री १२ नंतर अचानक काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होते. झोपण्यापूर्वी फोन बाजूला ठेवून योग्य झोप घेतल्यास हे हार्मोन्स संतुलित राहतात आणि वजन नियंत्रणात राहून मेटाबॉलिझम सुधारते.
44
Image Credit : stockphoto
'हा' हार्मोन चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाही
गाढ झोपेत असताना शरीरात 'ह्युमन ग्रोथ हार्मोन' चांगल्या प्रकारे तयार होतो. हा हार्मोन त्वचेच्या पेशींचे नूतनीकरण करतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ देत नाही. म्हणजेच कोणत्याही सौंदर्य उत्पादनांशिवाय नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी रात्री मोबाईल दूर ठेवणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. आजपासूनच रात्री ९ किंवा १० नंतर फोनला गुडबाय म्हणा.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

