Google Gemini च्या नवीन Nano Banana फीचरने तुमचा फोटो ३डी इमेजमध्ये रुपांतरीत करता येऊ शकतो. त्यासाठी कोणतेही पैसे मोजण्याची गरज नाही. अगदी काही सेकंदात तुम्ही हे करु शकता.
आजकाल सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड धुमाकूळ घालत आहे, ज्याचे नाव आहे ३D डिजिटल फिगर. याचा वापर सामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटी आणि राजकारणीही करत आहेत. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनीही AI टूलचा वापर करून फोटो पोस्ट केला होता, ज्याला लोकांनी खूप पसंत केले. जर तुम्हालाही असाच फोटो बनवायचा असेल पण काय करावे ते समजत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही टूल्सचा वापर करून थ्री डी पिक्चर कसे तयार करू शकता.
Google Gemini चे नवे फीचर
काही दिवसांपूर्वी Google Gemini मध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे. ज्याचे नाव Gemini 2.5 Flash Image आहे. सामान्य भाषेत याला “Nano Banana” असेही म्हटले जाते. हे AI टूल कोणताही फोटो काही सेकंदात ३D मॉडेलमध्ये बदलते आणि हे सामान्य फोटोपेक्षा अगदी वेगळे दिसते. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हे फीचर वापरण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. हे पूर्णपणे मोफत आहे.
Google Gemini वर ३D फोटो कसे बनवायचे?
- फोनमध्ये Google Gemini डाउनलोड करा
- Google AI Studio वर क्लिक करा
- होम पेजवर Gemini 2.5 Flash Image चा पर्याय मिळेल
- कसा फोटो हवा आहे त्याचा प्रॉम्प्ट टाका
- थ्री डी पिक्चरसाठी + सोबत फोटो अपलोड करा
- काही सेकंदात फोटो तयार होईल.
- शेवटी तो फोनमध्ये डाउनलोड करून शेअर करा
Google Gemini म्हणजे काय रे भाऊ?
ChatGPT प्रमाणे Google Gemini हा देखील एक AI प्लॅटफॉर्म आहे, जो Google Research च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. येथे टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ तयार करता येतात. याशिवाय अभ्यास ते ऑफिस वर्कमध्ये याचा वापर करता येतो. हे फोन आणि डेस्कटॉप दोन्ही ठिकाणी वापरले जाते.


