Simple Kitchen Hacks to Clean Tea Strainer Stains : चहाच्या गाळणीवरील चिकट डाग काढणे हे थोडे वेळखाऊ काम आहे. चहाची गाळणी सहज स्वच्छ करण्यासाठी फक्त एवढे केले तरी पुरेसे आहे.
Simple Kitchen Hacks to Clean Tea Strainer Stains : स्वयंपाकघरात नेहमी वापरली जाणारी एक वस्तू म्हणजे चहाची गाळणी. प्रत्येकाच्या घरात ती असतेच. सततच्या वापरामुळे त्यावर डाग दिसतात आणि ती घाण होते. यामुळे नंतर जंतूंची वाढ होऊ शकते. पण जास्त वेळ न घालवता चहाची गाळणी सहज स्वच्छ करता येते. त्यासाठी फक्त एवढे करा.
चहाच्या गाळणीचे चिकट डाग काढण्यासाठी हे उपाय करा:
1. डिशवॉश लिक्विड
गरम पाण्यात चहाची गाळणी भिजवून ठेवा. थोड्या वेळाने, डिशवॉश लिक्विड आणि स्क्रबर वापरून ती चांगली घासून धुवा. यामुळे डाग सहज निघण्यास मदत होते.
2. खाण्याचा सोडा
प्लास्टिक आणि स्टीलच्या चहा गाळण्या स्वच्छ करण्यासाठी खाण्याचा सोडा पुरेसा आहे. कोमट पाण्यात एक चमचा खाण्याचा सोडा मिसळा. त्यात चहाची गाळणी भिजवून ठेवा. थोड्या वेळाने ब्रशने चांगली घासून धुवा.
3. गॅस स्टोव्हचा वापर करून
गॅस स्टोव्हचा वापर करून धातूच्या चहा गाळण्या स्वच्छ करता येतात. गॅस पेटवून त्यावर गाळणी ठेवा. उष्णतेमुळे गाळणीला चिकटलेले डाग सहज निघून जातात. त्यानंतर डिशवॉश लिक्विड वापरून स्वच्छ धुतल्यास पुरेसे आहे.
किचन टिप्स- चहा गाळणीप्रमाणेच हा किचन हॅक वापरुन तुम्ही इतरही स्टिलच्या भांड्यांवरील काळे डाग काढू शकता. तुमचा स्टिलचा किचन गॅस स्टोव्ह असेल तर तुम्ही त्यावरील डागही काढू शकता.


