- Home
- Utility News
- Sharad Purnima 2025 : कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? 6 की 7 ऑक्टोबर? जाणून घ्या अमृत वर्षा कधी होणार!
Sharad Purnima 2025 : कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? 6 की 7 ऑक्टोबर? जाणून घ्या अमृत वर्षा कधी होणार!
Sharad Purnima 2025 : अश्विन महिन्यातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा तसेच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. यावर्षी शरद पौर्णिमेचा सण 2 दिवस साजरा केला जाईल. अशी मान्यता आहे की, शरद पौर्णिमेच्या रात्री आकाशातून अमृताचे थेंब पडतात.
14

Image Credit : Getty
शरद पौर्णिमेचे व्रत आणि स्नान-दान कधी करावे?
शरद पौर्णिमा हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या रात्री आकाशातून अमृत वर्षा होते, अशी मान्यता आहे.
24
Image Credit : Getty
कधी आहे शरद पौर्णिमा 2025?
पंचांगानुसार, अश्विन पौर्णिमा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:24 पासून 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 पर्यंत राहील. त्यामुळे शरद पौर्णिमेचा सण दोन्ही दिवशी साजरा केला जाईल.
34
Image Credit : Getty
आकाशाखाली खीर कधी ठेवावी?
ज्योतिषांच्या मते, 6 ऑक्टोबरच्या रात्री पौर्णिमेचा योग आहे. त्यामुळे याच रात्री आकाशाखाली खीर ठेवावी. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते, अशी मान्यता आहे. महाराष्ट्रात खिरीऐवजी बासुंदी ठेवण्याची प्रथा आहे.
44
Image Credit : Getty
शरद पौर्णिमेला स्नान-दान कधी करावे?
7 ऑक्टोबरला उदय तिथी असल्याने स्नान-दानासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. भगवान सत्यनारायणाची कथा आणि महर्षी वाल्मिकी जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाईल.

